IMD Weather Update: मागील एक महिन्यापासून राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही राज्यांमध्ये तर या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वाढत्या पावसामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला असला तरी आता भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भागात पावसाचा हाय अलर्ट
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, 12 जुलै ते 17 जुलै या कालावधीमध्ये अनेक राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने या राज्यासाठी हाय अलर्ट जारी केले आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने या राज्यासाठी हाय अलर्ट जारी केला आहे. IMD Weather Update
जम्मू-काश्मीरमध्ये पुढील तीन दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हरियाणा मधील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगाना, आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, मेघालय आणि उडीसा या राज्यांमध्येही जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हे पण वाचा| LIC ची भन्नाट योजना! या योजनेत एकदाच करा गुंतवणूक आणि मिळवा आयुष्यभर लाखो रुपयांची पेन्शन..
महाराष्ट्रातील पुढील हवामान अंदाज
महाराष्ट्रातही पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील विशेष कोकण आणि विदर्भात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाड्यात सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी असले तरी गेल्या काही दिवसापासून या भागात देखील पावसाने कसर भरून काढली आहे. दुसरीकडे विदर्भात मात्र पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
आता पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येथील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील सात दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने सर्वांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रशासनानेही या पार्श्वभूमीवर सर्व तयारी केली असून आपात्कालीन परिस्थितीत तोंड देण्यासाठी राज्य पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येत आहे. अशा गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा सुरक्षित ठिकाणी राहावे आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
1 thought on “पुढील 7 दिवस महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा हाय अलर्ट; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा..”