IMD Weather Update: महाराष्ट्राच्या दिशेनं मोठं संकट; पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! या 11 जिल्ह्यांना हाय अलर्ट..

IMD Weather Update: पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक भागांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. ज्यामुळे बचाव पथके आणि लष्करी सज्ज करण्यात आले आहेत. सध्याची स्थिती रायगड रत्नागिरी पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजी नगर जालना बीड आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विशेष नागपूर मध्ये हाय अलर्ट जारी केले आहे.

महाराष्ट्राला सध्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. IMD Weather Update

विदर्भाला पावसाने चांगले जोडले असून नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी, विटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट जरी आहे. जर पाऊस आणखीन वाढला तर लष्कराची मदत घेण्याची तयारी प्रशासनाने ठेवावी. सध्या एस डी आर एफ आणि एनडीआरएफ ची पदके सज्जा असून लष्कराचे जवानही सतर्क आहेत. आत्तापर्यंत 40 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी खबरदारी म्हणून नागपुरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांना अनावश्यक कामासाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा| आनंदाची बातमी! सोनं झालं स्वस्त; आता जोमात करा खरेदी; पाहा आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव..

कोकणात पावसाचा रेड कलर

कोकणात पावसाने अक्षरशः सहकार माजवला आहे. हवामान विभागाने कोकणासाठी हाय अलर्ट जारी केला असून अनेक जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्‍यता आहे कोकणातील काही भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी समुद्र किनारपट्टी जवळ न जाण्यास हवामान विभागाने सांगितले आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा धोका

मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आले आहे. मराठवाड्यातही आज मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. छत्रपती संभाजी नगर जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे. एकंदरीत पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे सूचना प्रस्तानाने दिली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!