IMD Weather Update : येत्या चार-पाच दिवसांमध्ये राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा, नवीन अंदाज जाणून घ्या

IMD Weather Update : उन्हाने तापलेल्या महाराष्ट्राला अवकाळी पावसाने दिलासा मिळतोय. एप्रिल मे महिन्यात अंगाची लाही लाह करणाऱ्या तापमानाचा कहर करणाऱ्या राज्यात आता अचानक वातावरणात मोठा बदल झालेला आहे. राज्यामध्ये शुक्रवारपासून अनेक भागांमध्ये ढगफुटी सारखा पाऊस कोसळला असून हवेमध्ये गारवा पसरलेला आहे. दिवसभरामध्ये उन्हाचा चटका सहन करणाऱ्या नागरिकांना संध्याकाळी रात्री अचानक पावसाच्या स्वरुपाने दिलासा मिळाला आहे. परंतु अनेक ठिकाणी शेती पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळत असला तरी शेतीचे नुकसान होत आहे. IMD Weather Update

मनमाड आणि परिसरात शुक्रवारी सायंकाळी आठ वाजेपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावलेली. सकाळपासून वाढते तापमान मात्र अचानक आलेल्या या मुसळधार पावसाने तापलेल्या शहर गारटून गेलं. तर रस्त्यावर भाजी विक्रेते, दुकानदार प्रवासी या सगळ्यांची मोठी फजिती झाली. पावसासोबत जोरदार वाऱ्याने धडक दिल्यामुळे वीज पुरवठा काही भागात खंडित झाला. नाशिक शहरात अशीच परिस्थिती निर्माण झाली. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून नागरिकांची गैरसोय व शेतकऱ्यांचे प्रचंड तारांबळ उडाली आहे.

या अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलेले आहे. तर कांदा, गहू, द्राक्ष अशा उभ्या पिकांवरती थेट आता अवकाळी संकट कोसळले. जे पीक बाजारात न्यायच्या तयारीत होते, त्यांच पिकावरती आता पावसाने पाणी फिरलय. एका बाजूला बाजारात भाव मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला हे असे अवकाळी संकट शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीत टाकून गेला आहे. काही शेतकरी म्हणतात “एवढं पिक उभा करून ठेवलंय, आता चार दिवस उशिरा पावलं तर सगळं वाहून जाईल”.

भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अपडेट नुसार, देशभरामध्ये सध्या एकाच वेळी पाच चक्रीवादळ यांची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम मध्य, पश्चिम आणि उत्तर भारतातील राज्यांवरती होतोय. IMD च्या अंदाजानुसार, 11 मे पर्यंत पावसाचं आणि वादळच सूत्र सुरूच राहणार असून पार्श्वभूमी वरती दिल्ली महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब,राजस्थान सारख्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर जम्मू-काश्मीर हिमाचल प्रदेश लडाख सह अनेक राज्यात वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे.

हवामाना झालेला बदल हा अजिब खेळ आता केवळ एक नैसर्गिक चमत्कार राहिला नाही, तर आपल्या जीवनशैलीवर शेतीवर आरोग्यावर थेट परिणाम करणाऱ्या गंभीर मुद्दा बनतोय. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानील सामोरे जावे लागले आहे.

हे पण वाचा: पंजाबरावांचा शेतकऱ्यांना तातडीचा संदेश! या जिल्ह्यात होणारा अवकाळी पाऊस, वाचा नवीन अंदाज

Leave a Comment

error: Content is protected !!