महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठी अपडेट! IMD चा मोठा इशारा

IMD WEATHER UPDATE : राज्यातील हवामानाबाबत भारतीय हवामान खात्याने नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये फेब्रुवारी महिन्यात उत्तर भारतासह महाराष्ट्रात देखील हवामान बदलले आहे, दिवसा कडक ऊन आणि रात्री गारवा असा हवामानाचा कल आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये एप्रिल सारखे उन्हाचे तापमान जाणवत आहे. IMD WEATHER UPDATE

मध्य महाराष्ट्र मध्ये हवामानात झपाट्याने बदल होत असून, दिवसा गारवा आणि दुपारी कडक ऊन अशी परिस्थिती आहे. नंदुरबार मध्ये कमल तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. पुण्यामध्ये बहुतेक ठिकाणी तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. साताऱ्यामध्ये कराड येथे तापमान 40 अंश सेल्सिअस झालेले आहे. बहुतेक भागामध्ये कमल तापमान साधारणपणेच आहे.

फेब्रुवारीमध्ये पहिल्या आठवड्या पर्यंत उत्तर भारतात धुके होते, परंतु त्यानंतर हवामान स्वच्छ झालेले आहे. आकाश उच्च असल्याने सूर्याच्या किरणाचा थेट प्रभाव पडत आहे. त्यामुळे हवेतील आद्रता कमी झाली आहे आणि तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम म्हणून उन्हाचा तीव्र प्रभाव जाणवतो.

सहसा होळीच्या सणा नंतर तापमान वाढते, परंतु यावर्षी फेब्रुवारी मध्यापर्यंत कुणाचाच प्रभाव वाढलेला पाहायला मिळत आहे. याचबरोबर चक्रीवादळाचा धोका देखील वाढत असल्याची माहिती समोर आलेली आहे. उत्तर भारतामधून हवामानात बदल होत असून दक्षिण भारतातून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे हवामानात चढउतार निर्माण झालेला आहे.

हवामान विभागाचे पुणे विभाग प्रमुख K.S होसाळीकर यांनी मध्य महाराष्ट्रामध्ये उन्हाचा प्रभाव अधिक जाणवत असल्याचे सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती पोस्ट करून कोणत्या भागामध्ये सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. याची माहिती दिलेली आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकांना उनाची चटके बसण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ते उपाययोजना करणे आवश्यक आहे.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज

बातमी स्त्रोत : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

(अशाच हवामान विषयक माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला हवामान अंदाज विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल जेणेकरून तुमच्या शेतीचे होणारे नुकसान वाचू शकणार आहात. त्यामुळे तुम्ही शेतीचे लवकरात लवकर उपाययोजना करू शकणार आहात. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या पर्यायांचा ऑफर करा)

8 thoughts on “महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठी अपडेट! IMD चा मोठा इशारा”

Leave a Comment