IMD Update : हवामान खात्याचा मोठा इशारा, राज्यात आजपासून तिन दिवस गारपीटीची शक्यता!


IMD Update : राज्याच्या हवामानाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. राज्यामध्ये एक मोठी समस्या उद्भवल्याने ३१ मार्च ते दोन एप्रिल या काळामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने हा हवामान अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. हवामान अंदाज काय म्हणतो पाहूया. IMD Update

भारतीय हवामान खात्याने नविन हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या हवामान अंदाजामध्ये 31 मार्च ते दोन एप्रिल या दरम्यान विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळामध्ये गारपीट ची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे नगर जिल्ह्यामध्ये देखील हवामान अंदाज वर्तवलेला आहे या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. या मुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सतर्क रहावे लागणार असे आव्हान करण्यात आलेले आहे.

खरे तर, यंदा पाऊस चांगला असल्याने रब्बी हंगामातील पिके देखील जोमा मध्ये आलेले आहेत. आता या पिकांची काढणी सुरू झाली असताना त्यांच्या वरती एक मोठे संकट आलेले आहे. यामुळे या भागात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहेत तर शासनाने शेतकऱ्यांना आव्हान केले आहे की जे पिके काढणीला आले त्यांनी लवकरात लवकर आपले पिके काढणीच्या तयारीला लागावे.

हवामान विभागाने दिलेल्या नवीन सूचनेनुसार, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमी वरती तुम्ही झाडाखाली किंवा झाडाजवळ तसेच खांब, विद्युत खांब, विद्युत वाहिन्या यांच्यापासून लांब राहणे आवश्यक. तसेच सुरक्षित ठिकाणी थांबणे गरजेचे आहे.

तसेच भारतीय हवामान खात्याने गारपिटीचा इशारा दिले असल्याने, शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी ताबडतोब सुरक्षित ठिकाणी जाणे आवश्यक आहे. विजा चमकत असताना मोकळे जागेमध्ये असाल तर गुडघ्यावरती बसून हात काने झाकावेत आणि डोके गुडघ्यांमध्ये घ्यावे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा नुकसान होऊ शकते. गारपीट होत असल्याने सुरक्षित ठिकाणी जाणे गरजेचे आहे. अन्यथा यामध्ये तुम्हाला इजा होण्याची शक्यता आहे.

जर काही शेतकऱ्यांनी शेतीमाल काढला असल्यास बाजार भाव तपासून योग्य त्या ठिकाणी विक्रीसाठी आणणे आवश्यक आहे. अन्यथा नुकसान होऊ शकते जर तुम्ही असे केल्यास तुमचे नुकसान होणार नाही व नुकसान होण्यापासून काळजी घ्या.

अशा पद्धतीने आपण हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला लेख आवडला असल्यास नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!

Leave a Comment

error: Content is protected !!