मोठी बातमी! राज्यातील या भागामध्ये पावसाचा इशारा, जाणून घ्या नवीन अंदाज

IMD NEWS : महाराष्ट्र च्या हवामानाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. भारतीय हवामान (IMD) खात्याने नुकतच दिलेल्या हवामान अंदाज मध्ये राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेचे तडाका तर काही भागांमध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे. चला तर जाणून घेऊया भारतीय हवामान खात्याचा सविस्तर अंदाज. IMD NEWS

गेले काही दिवसांपासून नागरिकांना उन्हाचा तडका बसत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच नागरिकांना उन्हाची चाऊल लागू लागली आहे. होळी पूर्वीच तापमान वाढत आहे, देशभरामध्ये साधारणपणे होळीच्या सणा नंतर उन्हाच्या जळा जाणवतात. मात्र, यावेळेस फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेचा प्रभाव जाणवतांना पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये कमल तापमान 40°c च्या जवळ पोहोचले आहे, तर किमान तापमानाची वाढ दिसून येत आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 23 आणि 24 फेब्रुवारी दरम्यान मध्य महाराष्ट्रातील काही भागात तर मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच उर्वरित भागांमध्ये उन्हाचा तडाका कायम राहणार असून, तापमान वाढीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज; राज्यावरती दुहेरी संकट!

पुढील काही दिवस कसे असतील?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सदस्यांना भारतावर चक्रकार वाऱ्यांचा प्रभाव असल्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. यामुळे पश्चिम बंगाल, ओडिसा आणि मेघालय मध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याच हवामान बदलाचा प्रभाव महाराष्ट्रातील काही ठिकाणी जाणवणारा असून, पूर्वेकडील वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

तसेच उर्वरित महाराष्ट्र मध्ये उन्हाचा तडाका कायम राहणार आहे तापमान वाढीचा अंदाज सध्या वर्तवण्यात आलेला आहे. पुढील चार ते पाच दिवसात तापमान फारसा बदल होण्याची शक्यता नाही. परंतु नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्याच्या सूचना नागरिकांना दिलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

राज्यामध्ये उन्हाचा तडाका वाढत असून, काही भागांमध्ये पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी पुरेशी पाणी प्या, आहार घ्या आणि शक्यतो दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळा. अशाच नवनवीन अपडेट साठी आजच आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल आणि हा लेख आवडले असल्यास नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद!

Leave a Comment

error: Content is protected !!