IMD New Alert : शेतकरी बांधवांसाठी महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील पावसाची वाट पाहत असाल आणि पुढील काही नियोजन करत असाल तर आता राज्यात पावसाची काही दिवस विश्रांती राहणार असल्याची अपडेट समोर आलेली आहे. याचा विपरीत परिणाम शेती वरती होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. IMD New Alert
हवामान खात्याने दिलेला ताज्या अपडेट नुसार, येत्या काही दिवसात राज्यभर पावसाचा जोर कमी होणार असून, काही भागांमध्ये केवळ तुरळक ते मध्यम स्वरूपांचा सरींचं स्वरूप राहणार आहे.
राज्यामध्ये 17 जुलै पर्यंत पावसाने सुट्टी घेतली असून, २० जुलै नंतर पुन्हा ढगांचा केस सुरू होईल असं हवामान खात्याच चांगला आहे. जुलै महिना सुरू झाला होता त्यावेळेस राज्यात काही ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाऊस पण झाला परंतु आता पावसाने विश्रांती घेतलेली आहे असं हवामान खात्याचा म्हणणं आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणपट्ट्यामध्ये सध्या फारसा पाऊस राहणार नाही, पण याचा फायदा शेतकऱ्यांना मशागतीसाठी मिळणार आहे. परंतु मराठवाड्यामध्ये पावसाची खरोखर गरज आहे. अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारचा अद्याप पाऊस झालेला नाही त्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर आणि इतर पिकांची पाने सुकाय लागली आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात तब्बल 2 लाख 78 हजार एकर क्षेत्रावर जास्त पेरण्या झाल्या आहेत. म्हणजे शेतकरी बांधवांनी यंदा नुसत्या आशेवर नाही, तर खरंच पावसाच्या भरोशावर पेरणी केली आहे. गेल्या वर्षी 1.94 लाख हेक्टरवर पेरणी झाली होत्या. पण यंदा तो आकडा 4.73 लाखे तर वरती पोहोचला आहे हेच दाखवतो की यावर्षी निसर्ग थोडा जास्त दयाळू ठरतोय.
पाऊस विश्रांती घेणार शेतकऱ्यांनो लक्ष द्या!
ही बातमी शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची ठरणार आहे पावसाचा ब्रेक म्हणजे विश्रांती नव्हे तर पुढच्या जमिनीला श्वास घेण्यासाठी परंतु मराठवाड्यामध्ये ही परिस्थिती जरा वेगळीच ठरणार आहे जर पावसाने वेळेअभावी हजेरी नाही लावली तर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता सध्या शेतकरी व्यक्त करत आहेत. काही शेतकऱ्यांनी अद्याप पेरणीच केली नाही तर काय शेतकऱ्यांनी कोरड्या रानात बी टाकून दिला आहे याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगाव लागणार आहे. यामुळे राज्यातील इतर भागांपेक्षा मराठवाड्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे.
राज्यात पावसाला केव्हा सुरुवात होणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्या अरबी समुद्रामध्ये मान्सूनवर वारे कमकुवत झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि मध्ये भागात ढगांचा वेग कमी झालाय, मात्र, बंगालच्या उपसागरात जुलै च्या तिसऱ्या आठवड्यात दाबाचा अनुकूल क्षेत्र तयार होणार आहे, ज्यामुळे वीस जुलै नंतर पुन्हा एकदा पाऊस दमदार हजेरी लावणार आहे. सध्या राज्यातील इतर भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला असला तरी मराठवाड्याचा अध्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही आता राज्यात पुढील परिस्थिती कशी राहते याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.