IMD Alert | राज्यावर अवकाळी पावसाचे मोठे संकट! IMD चा अलर्ट; तर या भागात पाऊस आणि गारपिटीचा इशारा

IMD Alert : भारतीय हवामान (IMD) खात्याने राज्यातील अनेक भागांमध्ये मोठा इशारा जाहीर केलेला आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसासह(Heavy rain and hail) गारपिटीचा दिलेला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD latest weather forecast) नवीन अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही भागात भारतातील 14 राज्यांसाठी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे. आगामी काही दिवसांमध्ये देशातील विविध भागांमध्ये वातावरणात बदल होणार आहे. उष्णतेच्या(Heat wave) लाटेसह वादळी वाऱ्यासह गारपिटीचा आणि मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. IMD Alert

या हवामान बदलाचे मुख्य कारण म्हणजे, पूर्व बांगलादेशावर चक्रकार वारे असल्याने भारताच्या अनेक राज्यांमध्ये वातावरणात अचानक बदल झालेला आहे. याचा परिणाम विविध राज्यांमध्ये दिसून येणार आहे. तर हवामान तज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा बदल अचानक झाल्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काळजी घेणे आवश्यक आहे.

तर महाराष्ट्र बाबत बोलायचे झाल्यास महाराष्ट्र मध्ये गेल्या काही दिवसापासून उष्णतेचे लाटेचा कहर नागरिकांना जाणवत आहे. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतेने हाल त्यांना पहिला मिळत आहे. यासोबत राजस्थान आणि गुजरात मध्ये देखील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने उंचांक गाठलेला आहे. महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी येथे या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे. या ठिकाणी 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. तर राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 40°c नोंद करण्यात आलेली आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नागरिकांना 18 मार्चपर्यंत उन्हाचा चटका बसणार आहे. यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे देखील गरजेचे असल्याचं म्हटले आहे.

या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने 14 ते 16 मार्च दरम्यान, देशातील जम्मू-काश्मीर, लडाक, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वादळी वाऱ्यासह या भागांमध्ये जोरदार पाऊस व हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच पंजाब हरियाणा पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये आणि राजस्थानमध्ये पुढील चार दिवस जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. .

तर 14 ते 17 मार्च दरम्यान ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यामध्ये 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने जोरदार वारे वाहतील, तसेच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील आयएमडीने वर्तवली आहे.

कोकण आणि गोवा या भागांमध्ये तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून, नागरिकांनी उष्णतेपासून योग्य बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याचा हवामान विषयक अंदाज जाणून घेण्यासाठी आमच्या पेज ला भेट देत रहा व हा लेख तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही हवामान अपडेट विषयक माहिती मिळेल.

1 thought on “IMD Alert | राज्यावर अवकाळी पावसाचे मोठे संकट! IMD चा अलर्ट; तर या भागात पाऊस आणि गारपिटीचा इशारा”

Leave a Comment

error: Content is protected !!