How to identify poisonous and non-poisonous snakes | पावसाळा म्हणजे हिरवागार शिवार, थंडगार वारा आणि मातीचा सुगंध… पण याच सोबत एक संकटही सापांचा संकट. शेतकऱ्यांच्या पायात, घराच्या कोपऱ्यात गोठ्यात गवताच्या ढिगार्यात.. साप कधीही आणि कुठून येईल सांगता येत नाही. पावसामुळे त्यांच्या बिळांमध्ये पाणी जात आणि ते उबदार जागा शोधत बाहेर येतात. मग कधी तरी मनुष्याला चावतात. How to identify poisonous and non-poisonous snakes
भारतात दरवर्षी लाखो लोकांना साप चावतो, आणि त्यात हजारो लोक जीव गमावतात. पण एक मोठा प्रश्न सतत ऐकायला येतो “सब विषारी आहे की नाही हे कसं कळणार?” चला तर मग जाणून घेऊया सहज समजेल अशी ट्रिक.
विषारी आणि बिनविषारी साप ओळखायची एक सोपी ट्रिक दात पहा!
जर तुम्हाला साप चावला असेल तर भीतीने घाबरून जाऊ नका. पहिल्यांदा इतकं लक्षात ठेवा की, तुम्हाला चावलेल्या जागी दोनच दातांचे खोल खून दिसत असतील, तर साप विषारी आहे.
पण जर खूप सारे करवती सारखे दात दिसले, म्हणजे त्या जागी बारीक सारखी खूण असतील, तर साप बिनविषारी असण्याची शक्यता जास्त आहे.
उदाहरण द्यायचं झालं तर धामण मोठा साप, पण बिनविषारी. चावल्यावर खूप साऱ्या दातांचे खुणा दिसतात.
नाग लांब सरसर करणारा विषारी साप, चावल्यावर फक्त दोन दातांची खोल निशान राहतात. ही माहिती गावकऱ्यांसाठी फार उपयोगीची आहे, कारण अशावेळी दहशत नको, शांत डोकं ठेवा.
साप चावल्यावर ही लक्षणे दिसतात.
अंगाला मुंग्या येणे, थंडी वाजणे किंवा घाम फुटणे, डोळ फिरणे किंवा चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चावलेल्या ठिकाणी सूज येणे.
काही जण अजूनही साप चावला की मांत्रिका कडे जातात बाबाकडे जातात. पण भाऊ ही सवय जीवावर बेतू शकते! ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा, तिथे इंजेक्शन म्हणजे अँटीव्हेनम मिळतं, जे जीव वाचू शकत.
सापाचा विष काही वेळात अंगात पसरतं, त्यामुळे वेळ वाया घालवायची मुळीच गरज नाही. डॉक्टरांचा सांगणं पाळा, आणि जीव वाचवा. ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करत जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती फक्त माहिती करता दिलेली आहे कुठलाही दावा करत नाही आणि अशी कोणती घटना घडली तर जवळच्या रुग्णालयात जाऊन योग्य उपचार घ्या)
हे पण वाचा | ही दोन झाडे पावसाळ्यात चुकूनही घराजवळ लावू नका! सापांना देतात निमंत्रण? तुमच्या घराजवळ आहे का?