Heavy Rain News : भारतीय हवामान खात्याने हवामान अंदाज वर्तवलेला आहे. दिल्ली संपूर्ण एनसीआर मध्ये हवामानात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि तापमानात घट नोंदवली आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील दोन दिवसांमध्ये शहरात पाऊस वादळी वारे वाहू शकतात. तर या पार्श्वभूमी वरती भारतीय हवामान खात्याने राज्यात कोणता हवामान अंदाज वर्तवला हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Heavy Rain News
दिल्ली एनसीआर मध्ये 27-28 फेब्रुवारी रोजी मुसळधार पाऊस?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी एनसीआर च्या आसपासच्या भागात हलका पाऊस पडला आहे. त्याचवेळी 27 आणि 28 फेब्रुवारी जोरदार वादळी वाऱ्यास पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारती हवामान खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, 26 फेब्रुवारी रोजी कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 15°c नोंदवले आहे. त्याचवेळी 17 फेब्रुवारी रोजी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे तर 28 फेब्रुवारी रोजी हवामान असेच राहील आणि या दिवशी कमाल तापमान 24°c आणि किमान 17 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
हे पण वाचा | पहिली आकाशात उडणारी कार; व्हिडिओ पाहून तुम्हीही होताल हैराण!
महाराष्ट्रात हवामान अंदाज!
खरंतर गेला काय दिवसांपासून महाराष्ट्राच्या हवामान अंदाज मध्ये सातत्याने बदल पाहायला मिळत आहे फेब्रुवारी महिन्यातच उनाचा तडाका वाढला आहे. मुंबई सह कोकणातील शहरे तापली आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई ठाणे रत्नागिरी पालघर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये उष्णतेचा तीव्र इशारा देण्यात आलेला आहे. फेब्रुवारी महिन्यातच या शहरांमध्ये 38 वर तापमान दिलेले आहे. यामुळे नागरिकांना उन्हाचे चटके बसू लागलेले आहेत. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात काही भागात दोन ते तीन अंशाने तापमान वाढणार असल्याचे सांगण्यात आलेला आहे .
हवामान विभागाचा इशारा!
राज्यामध्ये साधारणपणे होळी नंतर तापमान वाढत असते परंतु, फेब्रुवारी महिन्यातच तापमानात मोठी वाढ झालेली आहे. भारतीय हवामान खात्याने म्हंटले आहे की, कोकण गोवा या ठिकाणी तापमानात फारसा बदल होणार नाही तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भात येत्या २४ तासांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कोकण गोवा मुंबई या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. आज ठाणे, मुंबई, रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील दोन दिवस ही तापमानाची स्थिती कायम राहणार आहे. राज्य उर्वरित भागात सध्या कोरडे व शुष्क हवामान असून प्रचंड तापमान वाढला आहे.