Heatwave Maharashtra : राज्यामध्ये उन्हाचा कहर वाढत चालला असून हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यासह कोकणातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा दिलेला आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर अशा प्रमुख शहरांमध्ये तापमान 40°c पुढे गेलेले आहे. नागरिकांनी पुढील 24 तासात अत्यंत सावधगिरी बाळगावी, अशा आव्हान प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. Heatwave Maharashtra
मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. मात्र आद्रतेच्या पातळीमुळे उकडा अधिक जाणवेल. ठाणे, रायगड, रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुण्यात कमल तापमान 40°c तर किमान 32 इंच असेल राहणार असून सोलापूर मध्ये उष्णतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कोल्हापुरात तुलनेने तापमान कमी असून ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत राहणार आहे.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज! या 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट, पुढील 24 तास धोक्याचे!
मराठवाड्यात उष्णता प्रचंड वाढत आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते. 24 व 25 एप्रिल रोजी जालना वगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अकोला, अमरावती आणि विदर्भातील शहरांमध्ये तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पोहोचले आहे.
नाशिक मध्ये कमल तापमान 40°c असून, किमान तापमान 22°c असण्याची शक्यता आहे. हीच स्थिती छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी बीड हिंगोली नांदेड बुलढाणा या जिल्ह्यात दिसून येत आहे. सततच्या वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेला आहे. सकाळी 11 ते दुपारी चार या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलके व सुती कपडे परिधान करावे किंवा जास्त उन्हात जाणे टाळावे. वृद्ध, लहान मुले व गर्भवती महिलांनी अधिक सावधगिरी बाळगावी.
राज्यातील ही उष्णता लाट काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे शेतीसाठी सुद्धा पाणी योग्य नियोजन आवश्यक ठरणार आहे. जेवणाच्या तीव्रतेमुळे वीज वापरात वाढ होणार असून नागरिकांनी ऊर्जा बचतीकडे लक्ष द्यावे, असे सांगण्यात येत आहेत.
टीप: हवामान खात्याचा अधिकृत माहिती वर आधारित
हे पण वाचा | महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठी अपडेट! IMD चा मोठा इशारा