Hawamaan Andaaz : अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे, राज्याचे हवामानात झालेला बदल भारतीय हवामाना खात्याने अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे चिंतेमध्ये मोठी वाढ झालेली आहे. दक्षिणेकडून, बंगालच्या खाडीतून आणि गुजरातच्या दिशेने असे तीन सायकलोनिक सर्क्युलेशन तयार झाले असल्याने चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली असून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. राज्यातील वातावरणाकडे पाहता कधी मोठ्या प्रमाणात उष्णता तर कधी अचानक गारपीट आणि मुसळधार पाऊस अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवरती भारतीय हवामान खात्याने राज्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. Hawamaan Andaaz
महाराष्ट्राच्या हवामानाबाबत भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमी वरती राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यसह मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने केलेला आहे. यामुळे भारतीय हवामान खात्याचा हवामान अंदाज वेळोवेळी पहा आणि योग्य नियोजन करा आवश्यक असल्यास घराबाहेर पडा.
या जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस
आयएमडीच्या नवीन ताज्या हवामान अंदाजानुसार, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर छत्रपती संभाजी नगर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असून अधून मधून हलक्या सरी पडतील. तर परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात उद्या देखील हलक्या स्वरूपाचा अलर्ट देण्यात आलेला आहे.
या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 22 व 23 मार्च रोजी राज्यात आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह सरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. या ठिकाणी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तसेच विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे योग्य ते नियोजन करून शेतकऱ्यांना देखील नुकसान टाळता येऊ शकते.
हे पण वाचा | Panjab Dakh Havaman Andaj : राज्यात या तारखेपासून, अवकाळी पावसाची शक्यता! पंजाबराव काय म्हणाले पहा!
(अशाच नवीन हवामान अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून लवकरात लवकर माहिती मिळेल.)