तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती निधी खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर जाणून घ्या सर्व माहिती..


Grampanchayat Mahiticha Adhava: डिजिटल क्रांतीच्या या युगात आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी स्मार्टफोनवर उपलब्ध होत आहेत. आता यामध्ये केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ते म्हणजे मेरी पंचायत ची सुरुवात. हे ॲप केवळ डिजिटल सुविधा नसून ग्रामपंचायतच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रत्येक गावकऱ्यांना त्याच्या गावात किती विकास झाला आहे हे दाखवण्यासाठी एक मोलाचे ठरत आहे. तुमच्या ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध असलेल्या निधी कुठे किती खर्च झाला याची सविस्तर माहिती तुम्ही या ॲपच्या मदतीने जाणून घेऊ शकता.

हे पण वाचा| राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज..! या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी…

आपला भारत देश हा खेड्यापाड्यामध्ये वसलेला आहे आणि खेड्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकार कोट्यावधी रुपयाचा निधी थेट ग्रामपंचायतला उपलब्ध करून देत आहे. मात्र अनेकदा हा निधी नेमकं कशासाठी वापरला जातो गावात कोणती विकास कामे सुरू आहेत किंवा प्रास्तावित आहेत याची माहिती सर्वसामान्य ग्रामस्थांपर्यंत पोहोचत नाही. यामुळे एक प्रकारचा माहितीचा अभाव निर्माण होतो जो कधीकधी गैर कारभाराला किंवा भ्रष्टाचारांना खतपाणी घालू शकतो. यात समस्येवर मात करण्यासाठी मेरी पंचायत एक गेम चेंज करत आहे. या ॲपच्या मदतीने ग्रामपंचायतचा प्रत्येक व्यवहार प्रत्येक पैशाचा हिशोब आता थेट ग्रामस्थांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज अधिक जबाबदार आणि पारदर्शक होईल अशी अपेक्षा आहे.

हे पण वाचा| लाडक्या बहिणींना गुंतवणुकीसाठी खास 3 योजना; मिळेल जबरदस्त फायदा, जाणून घ्या

मेरी पंचायत काय आहे?

हे ॲप केवळ निधीच्या माहिती पुरते मर्यादित नाही तर ग्रामपंचायतीच्या कामकाजाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण माहिती यामध्ये उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया या ॲपच्या मदतीने तुम्हाला कोणती माहिती मिळू शकते.

  • तुमच्या ग्रामपंचायत मध्ये कोणकोणते सदस्य आहेत त्यांची नावे आणि संपर्क तपशील तुम्हाला येथे मिळेल. यामुळे तुम्हाला थेट त्यांच्याशी संपर्क साधने सोपे होईल.
  • ग्रामपंचायतच्या अंतर्गत स्थापन झालेल्या विविध समितीची माहिती आणि त्यांचे अध्यक्षांची नावे ही तुम्हाला माहीत होतील.
  • ग्रामपंचायत ने काढलेल्या कोणत्याही नवीन सूचना जाहिरात नोटीसा किंवा महत्त्वाचे निर्णय तात्काळ या ॲपवर उपलब्ध होतील. यामुळे कोणतीही महत्त्वाची बातमी तुमच्यापासून सुचणार नाही.
  • तुमच्या गावाला केंद्र किंवा राज्य सरकारकडून किती अनुदान मिळाले आहे. ते कोणत्या योजनेतून आले आहे आणि त्याचा वापर कोणत्या कामासाठी करण्यात आला आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल.
  • तुमच्या गावात कोणकोणती विकास कामे सुरू आहेत किंवा प्रस्तावित आहेत कोणत्या योजनेतून किती निधी मिळाला आहे याची माहिती तुम्हाला मिळेल.
  • ग्रामपंचायतच्या बँक खात्याची संख्या आतापर्यंत झालेल्या खर्च किंवा शिल्लक रकमा याचा तपशील तुम्हाला पहायला मिळेल.
  • गावात किती पाण्याची स्रोत आहेत आणि किती घरांना नळ जोडले गेले आहेत त्याची ही माहिती तुम्हाला मिळेल.
  • विशेष म्हणजे प्रत्येक विकास कामासाठी किती रक्कम मंजूर झाली प्रत्यक्षात किती खर्च झाला आणि शिल्लक रक्कम किती आहे याचा तपशील तुम्हाला मिळेल. यामुळे कामाच्या दर्जाबाबत कोणतीही शंका राहणार नाही.

हे पण वाचा| लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित मिळणार? मोठी अपडेट आली समोर…

मेरी पंचायत ॲपचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थांना फोटोसह अभिप्राय नोंदविण्याची सुविधा मिळते. याचा अर्थ असा की जर तुम्हाला गावात एखादे काम कमी दर्जाचे झाले असेल किंवा अगदी उलट एखादे काम अत्यंत चांगल्या दर्जाचे झाले असेल तर तुम्ही त्याचा फोटो काढून ॲप वर अपलोड करू शकता आणि आपला अभिप्राय सांगू शकता. या सुविधेमुळे ग्रामस्थांचा थेट प्रशासनात सहभाग वाढेल. चुकीच्या कामावर तातडीने लक्ष वेधले जाईल आणि चांगल्या कामाची प्रशंसा होईल इतरांनाही प्रेरणा मिळेल यामुळे स्थानिक पातळीवर जबाबदारीची भावना वाढीस लागेल आणि एकूणच प्रशासनामध्ये सुधारणा होईल. Grampanchayat Mahiticha Adhava

हे पण वाचा| शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता सुधारित पिक विमा योजना सुरू; जाणून घ्या काय होणार फायदा?

मेरी पंचायत ॲपचा सर्वात मोठा आणि दुर्गामी परिणाम म्हणजे भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मदत होईल. जेव्हा प्रत्येक कामासाठी किती खर्च झाला किती रक्कम मंजूर झाली आणि किती शिल्लक राहिली याची माहिती सर्वसामान्य नाव उपलब्ध होते तेव्हा गैर व्यवहार करण्याची शक्यता खूप कमी होते. कोणताही ग्रामस्थ आता आपल्या मोबाईलवरच ग्रामपंचायतच्या खर्चाचा हिशोब पाहू शकतो. यामुळे ग्रामपंचायत सदस्यावर आणि अधिकाऱ्यावर एक प्रकारचे उत्तरदायित्व निर्माण होईल कारण त्यांचे प्रत्येक पाऊलावर सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष असेल. डिजिटल युगातील हे एक क्रांतिकारी पाऊल आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!