Government Decision: राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणाऱ्या बातमी समोर येत आहे. नैसर्गिक आपत्ती हवामानातील बदल आणि सातत्याच्या घसरत्या बाजारभावामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाला आता महाराष्ट्र सरकार मोठा आधार देणार आहे. पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना एकूण 275 कोटी रुपये पेक्षा जास्त निधी विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे लवकरच ही विमा रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
कोणत्या कालावधीसाठी मिळणार मदत?
ही पीक विम्याची रक्कम प्रामुख्याने रब्बी हंगाम 2024–25 च्या उर्वरित निधी, खरीप हंगाम 2025 साठी चा पहिला हप्ता आणि 2024 चा शिल्लक निधी यासाठी वापरला जाणारा आहे. जो यापूर्वी मंजूर झाला होता परंतु अजून वाटप झाला नव्हता. ही रक्कम योग्य शेतकऱ्यांची निवड करून त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे समोर आले आहे. Government Decision
हे पण वाचा| या लाडक्या बहिणींना मिळाला नाही जून महिन्याचा हप्ता, जाणून घ्या कारण काय?
रब्बी हंगामासाठी 207 कोटी रुपयांचा निधी मंजूर
राज्य सरकारने रब्बी हंगाम 2024–25 करिता 207 कोटी पाच लाख 80 हजार रुपयांचा निधी विमा कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा जवळपास 15 कोटी 59 लाख रुपयांचा निधी देखील समाविष्ट आहे. ही संपूर्ण रक्कम आता विमा कंपन्यांना देण्यात आली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँकाच्या मध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे.
खरीप हंगाम 2025–26 साठी पहिला हप्ता
यासोबतच शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025–26 कविता सुधारित पिक विमा योजनेसाठी पंधराशे तीस कोटी रुपयांचा निधी पहिला हप्ता म्हणून मंजूर करण्यात आला आहे. यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी आणि आयसी आयसीआय लोम्बार्ड या दोन विमा कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. एवढेच नाही तर 2024 चा जो काही निधी शिल्लक होता. तू देखील आता मंजूर करण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाने 260 कोटी आणि शेतकऱ्यांचा हिस्सा 15.60 कोटी रुपयाचा निधी विमा कंपन्यांना दिला आहे. त्यामुळे मागच्या हंगामातील प्रलंबित प्रकरणे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी येणार पैसे?
राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळेअनेक महिन्यांपासून मदतीची वाट पाहणारे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच ही विमा कंपन्यांचे नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे. हे मंजू रक्कम थेट डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल. ज्यामुळे त्यांना मोठा जिल्हासा मिळेल. या मदतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास नक्कीच मोठी मदत होईल.
1 thought on “Government Decision: शेतकऱ्यांसाठी 275 कोटींची मदत मंजूर! लवकरच खात्यात येणार पैसे? जाणून घ्या सविस्तर”