Google Pay Loan : सध्या डिजिटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग आपण सर्वजण करत आहोत. डिजिटल पेमेंट, सोशल मीडिया याचा वापर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये इंटरनेट द्वारे केला जात आहे. तर सध्या डिजिटल माध्यमातून कर्ज देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे कर्ज आपल्याला काही मिनिटांमध्ये मिळतात आणि ते आपल्या खात्यात जमा होतात परंतु काही नियम असतात ते आपण न वाचता घेतो. नंतर मग आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा. जर तुम्ही देखील गुगल पे ॲपवरून कर्ज घेत असाल तर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. Google Pay Loan
खरंतर गुगल पे ॲपवरून पैसे पाठवन, बिल भरायला किंवा रिचार्ज करायला आपण सगळेच जन या प्लॅटफॉर्मचा उपयोग करतो. पण आता गुगल पे वरून कर्ज घेण्याची सुविधा देखील उपलब्ध झालेली आहे. आणि अनेकांनी त्याचा वापर करायला सुरुवात केली आहे. पण हा पर्याय निवडताना काही गोष्टी तुम्ही दुर्लक्षित करता, आणि मग नंतर पश्चाताप करावा लागतो. म्हणूनच कर्ज घेणारी हे फायदे तोटे नियम समजून घ्या मगच तुमचा पुढचा निर्णय घ्या.
गुगल पे वरून कर्ज काय आहे प्रक्रिया?
गुगल पे ॲप्स मधून वैयक्तिक कर्ज मिळवणे ही एक डिजिटल प्रक्रिया आहे. HDFC BANK, ICICI BANK, आणि काही NBFC (नोन बँकिंग फायनान्स कंपन्या) या अँप च्या माध्यमातून जोडलेले आहेत. कर्जासाठी तुम्ही गुगल पे ॲप्स मध्ये Loan किंवा Kredit शिक्षण मध्ये जाऊन तुमच्या गरजेनुसार रक्कम आणि कालावधी टाकून अर्ज करू शकता. काही मिनिटात तुम्हाला मंजुरी मिळते आणि कर्जाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होते.
पण ही प्रक्रिया संपूर्ण सहज दिसत असली तरी यामागे काही लपलेले धोके देखील आहेत.
गुगल पे वरून कर्जाचे फायदे काय?
– प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन असल्याने बँकेत जाण्याची गरज नाही, काहीच मिनिटांत कर्ज मंजूर आणि थेट खात्यात जमा, 10 हजार ते 8 लाख रुपयांपर्यंतचा पर्याय, कागदपत्रं पूर्ण असतील, क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर लगेच मंजुरी, ठराविक अटींवर वेळेआधी फेडल्यास फायदे
पण… धोके काय आहेत?
गुगल पे स्वतः कर्ज देत नाही हे अॅप फक्त तुम्हाला कर्जदात्यांशी जोडतं. कर्जाचे सर्व नियम, व्याजदर, दंड आणि अटी त्या NBFC किंवा बँकेकडून ठरवल्या जातात.
अधिक व्याजदर क्रेडिट स्कोअर कमी असेल तर 10.99% ते 36% पर्यंतचा उच्च व्याजदर लागू शकतो, जो पारंपरिक बँकांच्या तुलनेत खूप जास्त असतो.
प्रोसेसिंग फी आधीच वजा होते काही कंपन्या कर्ज रकमेवर 1% ते 3% पर्यंतची प्रोसेसिंग फी तुमच्या रकमेतून आधीच कापतात. म्हणजे 1 लाखाचं कर्ज घेतलं तरी तुमचं खात्यात 97-98 हजारच येतात.
वेळेवर हप्ता न भरल्यास दंड हप्ता वेळेवर न भरल्यास मोठ्या प्रमाणावर पेनल्टी लागते. यामध्ये दररोजच्या दंडाचाही समावेश असतो.
Prepayment penalty – काही कंपन्या वेळेआधी कर्ज फेडल्यासही अतिरिक्त चार्जेस आकारतात.
कर्ज घेण्याआधी ‘हे’ नक्की वाचा
Loan Agreement नीट वाचा सगळी लहान अक्षरं, टीप, टर्म्स अँड कंडिशन्स समजून घ्या. EMI, व्याजदर, दंड, Pre-closure charges याबाबत स्पष्ट माहिती घ्या. NBFC किंवा बँकेची पारदर्शकता तपासा कोणताही अज्ञात किंवा अघोरी कर्जदाता असेल तर त्यापासून दूर रहा. गुगल पेवरील कर्ज घेणं सहज वाटत असलं तरी ‘गोड गळा’ ऐकून पैसे उचलू नका.
जर तुम्ही गुगल पे अथवा कोणतेही डिजिटल माध्यमातून कर्ज घेत असाल तर तुमच्या गरजेनुसार उपयुक्त कर्ज घ्या पण विचार न करता घेतलेले कर्ज पुढे डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी नियम समजून घ्या अटी वाचा आणि फसवणुकीपासून वाचण्यासाठी फक्त अधिकृत NBFC आणि बँकेकडूनच कर्ज स्वीकारा.
(Disclaimer : मी दिलेली माहिती प्रसार माध्यमांच्या आधारित आहे याबाबत आम्ही कुठलाही दवा करत नाही आणि कर्ज घेण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.)
हे पण वाचा | आता कॅश डिपॉजिटसाठी बँकेत जायची गरज नाही, ATM मधून UPI ने जमा करता येणार पैसे; जाणून घ्या संपूर्ण