Gold Silver Price Today : सध्या सराफ बाजारामध्ये दररोज सोन्या-चांदीच्या दरांमध्ये होणाऱ्या चढवतारांमुळे ग्राहक ही संभ्रमात पडले आहेत. लग्न सराईचा काळ सुरू असल्यामुळे बाजारात खरेदीचा ओघ सुरू आहे. असेतच आपल्याला एक मोठी बातमी हाती लागलेली आहे. चांदीच्या दारात मोठी घसरण झाली असून, सोन थोडासा महाग झाला आहे. त्यामुळे ज्यांना चांदी घ्यायची आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे. Gold Silver Price Today
नवीन दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा
जळगाव सराफ बाजारामध्ये चांदीचा दर तब्बल दोनशे रुपयांनी घसरला असून सध्या चांदीचा दर 97 हजार पाचशे रुपये प्रत्येक किलो इतके आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरात सातत्याने बदल दिसून येत होता, पण आजच्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. चांदीचा भाव 99,000 घरात गेल्यानंतर ग्राहकांनी खरेदी करण्याचे थांबवले होते. मात्र आता पुन्हा एकदा बाजारात चांदी खरेदीसाठी गर्दी निर्माण झालेली आहे.
अमेरिकेतील आकडेवारींकडे सर्वांचे लक्ष
लवकरच अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी जाहीर होणार आहे. त्यामध्ये त्या ठिकाणचा GDP, बेरोजगारीचे प्रमाण आणि आयात निर्याती संदर्भातील आकडे महत्त्वाचे ठरणार आहेत. या आकड्यांच्या आधारे सोनं चांदीच्या किमतींना दिशा मिळणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस बाजारासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
ग्राहकांसाठी सल्ला – योग्य वेळ साधा
सध्या चांदीच्या खरेदीसाठी योग्य वेळ असून ती, 97 हजारांच्या खाली गेल्यास आणखी एक संधी निर्माण होऊ शकते. सोने थोडे महाग असलं तरी अजूनही सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे लग्नकार्य असो, की दीर्घकालीन गुंतवणूक, योग्य दर मिळाला तर खरेदी करण्यास हरकत नाही. मात्र दररोज बदलणाऱ्या बाजारावर बारीक नजर ठेवणे गरजेचे आहे.