Gold Rate Today | सोन खरेदी करायचा आहे परंतु आता तुम्ही विचारात सोडून द्या, कारण आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. एकीकडे दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आणि हे सोन्याचे दर सर्वसामान्यांसाठी एक मोठी चिंताच ठरत आहे. आपण बाजारामध्ये काही खरेदी करायचं म्हटलं तर आता तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्यासाठी नवीन दर काय आहेत हे आपण एकदा जाणून घेऊया. Gold Rate Today
24 कॅरेट सोन गगनाला भिडले!
आजच्या बाजारामध्ये शुद्ध 24 कॅरेट सोन एक लाख तीन हजार पाचशे सतरा रुपये प्रति 10 g दराने विकला जात आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या दारात तब्बल 994 रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजे काल जे दागिने घेणे शक्य होतं, ती आज किंचित अवघड वाटू शकत. आज सोन्याचा खुला बाजार दर 1,00,502 रुपये आहे, तर जीएसटी सह हा दर 1 लाखांच्या पलीकडे गेला आहे.
चांदीसुद्धा मागे नाही, किलोचा दर 1.18 लाखांवर
चांदीच्या दरात देखील मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज चांदीचा भाव प्रति किलो एक लाख 18 हजार 965 रुपये इतका आहे. कालच्या तुलनेत हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या घरगुती वापरासाठी किंवा लग्न खरेदीसाठी चांदीचा विचार करत असाल तर भाव बघून दोनदा विचार करावा लागणार आहे. सर्वसामान्यांचे तर टेन्शन मोठ्या प्रमाणात वाढले.
जुलै महिन्यामध्ये सोन आणि चांदीच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे. एका महिन्यात सोन 4616 रुपयांनी आणि चांदी 8983 रुपयांनी महाग झाली. म्हणजे घरात लग्न किंवा खास खरेदी नियोजन करत असाल, तर खर्च थोडा अधिकच लागेल.
(Disclaimer: वरील दिलेले दर हे प्रसारमाध्यम व माहिती स्त्रोतांच्या आधारे आहे, याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)
हे पण वाचा | सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण; नवीन दर एकदा पहाच! 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाहीर!