आज सोन्याच्या भावात वाढ झाली की घसरण? जाणून घ्या आजचे सोन्याचे ताजे दर..

Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठा चटका बसत आहे. गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दारात चढ-उतार सुरू आहे. शुक्रवारी मात्र दोन्ही धातूंच्या किमती चांगल्याच वाढल्या आहेत. आज सोन्याच्या किमतीत तब्बल 600 रुपयाची मोठी वाढ नोंदवली आहे. आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 99000 रुपये एवढा आहे. तर एक किलो चांदीचा दर एक लाख 11 हजार रुपये एवढा आहे. सोन्याच्या या दरवाढीमागे अनेक आंतरराष्ट्रीय देशांतर्गत घडामोडी कारणीभूत आहेत.

प्रमुख शहरातील सोन्याचे दर

जर तुम्ही आज सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर देशातील प्रमुख बाजार समितीत आजचे दर काय आहे ते जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. Gold Rate Today

मुंबई:

  • 22 कॅरेट सोने 90750 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे.
  • 24 कॅरेट सोने 99000 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहेत.

दिल्ली:

  • 22 कॅरेट सोने 90750 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.
  • 24 कॅरेट सोने 99150 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.

चेन्नई:

  • 22 कॅरेट सोने 90750 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.
  • 24 कॅरेट सोने 99000 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.

हे पण वाचा| आधार कार्डच्या नियमात मोठ्या बदल! पॅन कार्ड, रेशन कार्डधारकांना ‘हे’ करावे लागणार..

कोलकत्ता:

  • 22 कॅरेट सोने 89990 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे.
  • 24 कॅरेट सोने 99 हजार रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.

जयपुर, गाजियाबाद, लखनऊ, नोएडा:

  • 22 कॅरेट सोने 90900 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.
  • 24 कॅरेट सोने 99,150 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.

बेंगळुरू, पटना:

  • 22 कॅरेट सोने 90750 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.
  • 24 कॅरेट सोने 99 हजार रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.

दरवाढी मागे काय कारण आहे?

सोन्याच्या दरवाडीमागे काय कारण आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सोन्याचे दर केवळ स्थानिक कारणामुळे नाहीतर जागतिक बाजारातील घडामोडी वर अवलंबून असतात. मेहता इक्विटीजचे उपाध्यक्ष राहुल कलंत्री यांच्या मते, फेडरल रिझर्वच्या बैठकीत कोणतीही मोठी घोषणा न झाल्यामुळे सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. डॉलर रेजन्स 97.3 पर्यंत घसरला आणि ट्रेझरी उत्पादनात घट झाल्यामुळे सोन्याचा दर वाढला असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

याव्यतिरिक्त अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाव्य टोलिफ धोरणांनी आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ उडवली आहे. ब्राझील मधून येणाऱ्या तांबे आणि इतर वस्तूवर मोठा कर आकारला जात आहे. मात्र चीन आणि युरोपियन सुरू असलेल्या चर्चा सखाराम वाघ असल्याने यामध्ये काही दिवसात मोठी घसरण होऊन दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर अशा अनिश्चितेमुळे सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक नागरिक पाहतात. वाढत्या गुंतवणुकी सोबत सोन्याची वाढती मागणी देखील सोन्याचे दर वाढणे मागे मोठे कारण मानले जात आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!