Gold Rate Today: मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. मात्र आज 29 जुलै 2025 रोजी सोन्याच्या दरामध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. जर तुम्ही देखील सोन्याच्या किमतीमध्ये घसरण होण्याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरत आहे. सोन्याच्या किमतीमध्ये झालेले घसरण खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. चला तर मग जाणून घेऊया आज सोन्याची किंमत किती आहे. तुम्ही देखील सणासुदीच्या निमित्ताने किंवा नवीन लग्नाच्या हेतूने नवीन दागिने खरेदी करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरामध्ये मोठा बदल पाहायला मिळाला होता. 23 जुलै 2025 रोजी शुद्ध सोन्याचा दर 1 लाख 2330 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा होता. त्यानंतर मात्र या मौल्यवान धातूच्या किमतीमध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळाली आहे. 24 ते 26 जुलै या कालावधीमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. 27 आणि 28 जुलै रोजी सोन्याचे दर स्थिर राहिले असले तरी आज 29 जुलै रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे.
हे पण वाचा| पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! इतक्या रुपयांची फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् दर महिन्याला मिळवा ₹20,000
आजचे सोन्याचे दर
आज 29 जुलै 2025 रोजी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये अनुक्रमे 80 रुपये, 100 रुपये आणि 110 रुपये प्रति दहा ग्राम एवढी घसरण झाली आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर पुढील प्रमाणे आहेत. मुंबई पुणे नागपूर ठाणे कोल्हापूर जळगाव 18 कॅरेट सोने 74 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. 22 कॅरेट सोने 91 हजार 500 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. 24 कॅरेट सोने 99820 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.
उद्या ३० जुलै 2025 रोजी राज्यातील नाशिक लातूर वसई विरार आणि भिवंडी या शहरांमध्ये सोन्याचे दर थोडे वाढू शकतात. नाशिक लातूर वसई विरार भिवंडी मध्ये ती जुलै 2025 रोजी अपेक्षित दर: 18 कॅरेट सोने 74 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट चोरी 91,530 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोय 99 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे होऊ शकते.
सोन्याच्या दरात जरी घसरण झाले असले तरी चांदीच्या किमती मात्र स्थिर असल्याचे दिसत आहे. गेल्या तीन दिवसापासून चांदीची किंमत आहे तशीच स्थिर आहे. तीन दिवसांपूर्वी म्हणजेच 26 जुलै 2025 रोजी चांदीच्या दरात दोन हजार रुपयाची मोठी घसरण झाली होती. त्यानंतर 21 जुलै 2025 रोजी चांदीची किंमत एक लाख 16 हजार रुपये प्रति किलो एवढी होती. 23 जुलै 2025 रोजी एक लाख 19 हजार रुपये प्रति किलो पर्यंत वाढ झाली. 23 जुलै नंतर पुन्हा चांदीच्या किमतीमध्ये घसरण झाली आणि 24 जुलै रोजी एक हजार रुपये आणि 26 जुलै रोजी दोन हजार रुपयाची मोठी घसरण चांदीच्या किंमतीमध्ये झाली. आज एक किलो चांदीचा दर एक लाख 16 हजार रुपये इतका आहे.