Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढउतार सुरू होता. परंतु आत्ताच मिळालेल्या बातमीनुसार सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा मोठा फटका बसणार आहे. दिल्ली सराफ बाजारामध्ये निवडणुकीमुळे बाजार बंद असल्याने वायदे बाजारात मोठी उसळी पाहायला मिळालेली आहे. Gold Rate Today
सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ!
देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज ( MCX ) वर सोन्याच्या किमतीमध्ये व मोठी वाढ झालेली आहे. 4 एप्रिल 2025 रोजी डिलिव्हरी साठी सोन्याचा दर 1.06% म्हणजे 888 रुपयांनी वाढून 84,685 रुपये प्रति दहा ग्रॅम झालेला आहे.
तसेच, 5 मार्च 2025 रोजी डिलिव्हरी साठी सोन्याची किंमत 1.04% ( 862 रुपयांनी) वाढून 84,024 रुपये प्रति दहा ग्राम वर पोहोचली आहे. या सततच्या वाढीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे लक्ष बाजाराकडे लागलेले आहे.
चांदीच्या किमतीत वाढ!
सोन्या बरोबर चांदीचे किमतीत देखील वाढ झालेली आहे. MCX मल्टी एक्सचेंज वर 5 मार्च 2024 रोजी डिलिव्हरी साठी चांदीचा दर ०.३% म्हणजे 358 रुपयांनी वाढ झालेली आहे. त्यानंतर चांदीचा दर 96 हजार 67 रुपये किलो झालेला आहे. ही वाटचालीच्या बाजारात मजबू स्थितीचे आणि उंच मागणीचे प्रतिबिंब ठरले आहे.
हे पण वाचा | ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार इतके पैसे? RBI लवकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
सोन्या-चांदीच्या दरवाडीमागे कारणे
बाजार तज्ञांच्या मते, सोन्याच्या चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. यामुळे जागतिक अनिश्चित आणि आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे.
अनेक देशांमध्ये राजकीय उलथपालथ सुरू असलेले त्यामुळे गुंतवणूकदारांना पारंपारिक शेअर बाजार आणि चलन बाजाराऐवजी सुरक्षित गुंतवणूक पर्यायांवर भर द्यावा लागत आहे.
अमेरिकन डॉलरच्या किमतीमध्ये काही प्रमाणात घट झाल्याने सोने आणि चांदीच्या किमतींना चालना मिळालेले आहे. अनेक देशांच्या केंद्रीय बँका आर्थिक स्थिरतासाठी सोन्याचा साठा वाढत आहे. त्यामुळे बाजारात सोन्याची मागणी वाढलेली आहे. भारतीय लग्नसराई मध्ये देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढती, त्यामुळे किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे.
गुंतवणूकदारांसाठी तज्ञांचा सल्ला
जरा तुम्ही देखील दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे, किमतीत जास्तीत जास्त वाढणार आहे. त्वरित नफा पाहण्या ऐवजी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करावा.
बाजार अस्थिर असल्याने, आपल्याला गुंतवणुकीत विविधता ठेवा, फक्त सोन्यात किंवा चांदीत पैसे गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणुकीचे पर्याय देखील तपासा. अनुभवी गुंतवणूक सल्लागारांशी चर्चा करून योग्य गुंतवणूक करून निर्णय घ्या.
महत्त्वाची माहिती
सोन्या चांदीच्या किमती सध्या उंचांक गाठत असला तरी भविष्यात त्यात चढउतार संभाव्य जागतिक आर्थिक परिस्थिती केंद्रीय बँकांचे धोरण आणि गुंतवणूकदारांचा कल यानुसार भाव बदलत असतात. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूक संयम बाळगून अभ्यासपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे तसेच तज्ञांचा सल्ला घेणे देखील आवश्यक आहे.
3 thoughts on “सोन्याच्या दरात तुफान वाढ! जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर”