Gold Rate News : सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तर तुमच्या घरामध्ये लग्न आहे आणि तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. कारण आज बाजारामधून एक मोठी अपडेट समोर आली असून सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. चला तर जाणून घेऊया नवीन दर काय आहेत. Gold Rate News
आपल्या इकडे, सनवार किंवा घरामध्ये एखादं शुभ कार्य, लग्न सराई असो आपण सगळं जण विचार करतो यार सोन खरेदी करायला हवा आणि सणासुदीनिमित्त जर सोने खरेदी केले तर आपल्याकडे शुभ मानलं जातं. परंतु तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करताय, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की, गेलं काही दिवसांपासून सोनं काही थांबत नाहीये! दरवाढ थांबायचं नाव घेत नाही आणि आज तर थेट एक लाखांच्या पलीकडे भाव गेलेले आहेत. सोन म्हणजे फक्त दागिने नाही, तर हक्काची गुंतवणूक आणि त्याच्या भाववाढीने आता सर्वसामान्य माणूस परेशान झालेला आहे.
आज जळगाव सराफ बाजारामध्ये सकाळी सोन्याच्या दारामध्ये तब्बल आठशे रुपयांची मोठी वाढ पाहायला मिळाली. या वाढीमुळे 24 कॅरेट सोन (10 ग्रॅम) थेट GST सह एक लाख एक हजार रुपयांवर पोहोचला आहे. दररोज सोन्याच्या दुकानात जाणाऱ्या बायका आता भाव विचारून माघारी फिरत आहेत. तर काहींच्या चेहऱ्यावरती चिंता पष्ट दिसत आहे. आपण मागेच सोनं खरेदी करायला हवं होतं.
राहुरी तालुक्यातील सरस्वती ताई म्हणतात मुलीचे लग्न ठरलंय दिवाळीत, पण रोज सोन पाहिला गेला की भाऊ एक तर वाढलेला असतो किंवा दुकानात गर्दी असते. दहा ग्रॅम सोन आता लाखांच्या पुढे गेले. गरीब माणसांना काय करायचं आता? फोटो काढून ठेवायचा का हातात बांगड्यांच्या जागी?
सोन्याचा दर वाढल्यामुळे ज्यांचं लग्न समोर आहे, अशा कुटुंबांसाठी ही परिस्थिती अडचणीची ठरत आहे. अनेक जण आता हलक्या वजनाचे दागिने, डिझाईनचे विकल्प किंवा अगदी चांदीचे पर्याय बघताय.
या भावडीचे मुख्य कारण आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोरी, आणि गुंतवणूकदारांनी सोन्याकडे पुन्हा वळलेली नजर हे आहे. जागतिक पातळीवर सोन सुरक्षित गुंतवणूक मानले जाते आणि त्यामुळे कोणतीही मोठी आर्थिक किंवा राजकीय घटना घडली की सोन्याचे दर चटकन वाढत असतात.
तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचे विचार करत असाल तर बाजारातील बाजार भाव आणि तज्ञांचा सल्ला घेऊन सोने खरेदी करा आणि अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो करत चला
(Disclaimer: वरील दर आणि माहिती प्रसारमाध्यमांचे आधारे आहे योग्य माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा)
हे पण वाचा | आज सोन्याच्या भावात वाढ झाली की घसरण? जाणून घ्या आजचे सोन्याचे ताजे दर..