Gold Rate News : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी आज 24 कॅरेट सोन्याचा दर 86 हजार 810 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 79,590 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे त्याच वेळी एक किलो चांदीचा दर 99,400 रुपयांवरती स्थिर आहे. Gold Rate News (Gold Rate News: Gold prices are seeing a significant increase as the wedding season is currently underway.)
सोन्याचा भाव वाढतच आहे
गेले काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने वाढवताना आपल्याला पाहायला मिळत रविवारी प्रति तोळा सोन्याचा दर 87,700 रुपये तर 20 जानेवारी रोजी 81 हजार रुपये होता. जर हि वाढ अशीच सुरू राहिली तर पुढील काही महिन्याचा सोन्याचा दर एक लाख रुपये प्रति तोळा घरात पोहोचण्याची शक्यता आहे. असा अंदाज सराफ बाजार तज्ञांनी वर्तवलेला आहे.
सोन्याची खरेदी विक्री मर्यादित
सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सध्या लग्न मुंज आणि इतर कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये लोकांकडून सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अंगठ्या, सोन्याच्या साखळ्या, मंगळसूत्र पारंपारिक दागिन्यांची विक्री सुरू असला तरी कोणाची बाजारपेठेमध्ये मंदीचे वातावरण आहे.
हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती
सोन्याचा दर वाढण्याची कारणे
- सोन्याचे दर वाढण्याचे काही प्रमुख कारणे आहेत. अमेरिकेतील सत्तापरिवर्तन नंतर धोरण्यामध्ये झालेले बदल आणि कनडतील बँकेचे व्याजदरात केलेली कपात व अंतरराष्ट्रीयबाजारपेठेत गुंतवणुकीसाठी सोन्याला वाढती मागणी.
गेल्या काही महिन्यातील सोन्याचे दर (प्रती तोळा )
महिना | सोन्याचा दर ( प्रती तोळा ) |
नोव्हेंबर 2024 | 75,000 |
डिसेंबर 2024 | 78,000 |
जानेवारी 2025 | 82,000 |
फेब्रुवारी 2025 | 87,000 |
आजचा सोन्याचा आणि चांदीचा बाजारभाव
24 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 300 रुपये प्रति दहा ग्रॅम (GST सह ₹87,859) 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹79,700 रुपये प्रति दहा ग्रॅम. १८ कॅरेट सोन्याची किंमत ₹67,400 प्रति दहा ग्राम. प्रति एक किलो चांदीची किंमत ₹96,000 ( GST सह ₹98,880 )
सोन्याच्या वाढत्या किमती पाहता, गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी. आगामी काळामध्ये तर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने योग्य वेळी खरेदी करण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.
(अशाच नवनवीन सोन्याचे किमती जाणून घेण्यासाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर बाजार भाव विषयी माहिती मिळेल.)