Gold Price Update : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहेत. परंतु मध्यंतरी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा महागाईचा फटका बसत आहे. सध्या सोन्याचे नवीन दर दहा ग्रॅम नुसार 90 हजार रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. ऑल इंडिया सराफ असोसिएशन माहितीनुसार, जागतिक बाजारातील चढ-उतार आणि भारतीय रुपयांचे घसरण मूल्य ही प्रमुख कारणे आहेत.Gold Price Update
डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णयाचा परिणाम
अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि ॲल्युमिनियमच्या आयातीवर 25% टेरिफ लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून, यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय स्तरावर त सोन्याचे किमती झपाट्याने वाढत आहेत, ज्याचा परिणाम भारतीय बाजारावर देखील दिसून आलेला आहे.
हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती
भारतात सोन्याच्या आणि चांदीच्या नव्या किमती (New gold and silver prices in India)
- 24 कॅरेट सोने : ₹86,070 प्रति दहा ग्रॅम
- 99.5% शुद्ध सोने : ₹88,100 प्रति दहा ग्रॅम
- चांदीचा दर : ₹ 97,500 प्रति किलो
आगामी काळात सोन्याच्या किमती आणखी वाढणार का ?
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणावामुळे सोन्याच्या दरात पुढील काही महिन्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ING बँकेच्या अहवालानुसार, सोन्याचा दर $3,000 प्रती अंशापर्यंत जाऊ शकतो.
सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे अनेक गुंतवणूकदारांना सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करणे भाग पाडले आहे. आगामी काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय महत्त्वाचा ठरू शकतो, त्यांना उत्तम परतावा देखील मिळू शकतो. परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे कारण यामध्ये तोटा होण्याची भीती शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला या निर्णयामुळे जागतिक आर्थिक अस्थिरता निर्माण झाली असून, त्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. भारतात सोन्याचा दर 90000 रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे पुढील काळात काही दिवसात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ योग्य असू शकतो.
(अशाच सोन्याचा बाजार भाव जाणून घेण्यासाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचे जेणेकरून तुम्हाला माहिती लवकरात लवकर मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी दिलेल्या पर्यायांचा वापर करा.)