Gold Price Today Maharashtra | राज्यभरातील बाजारपेठेमध्ये सध्या सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झालेली आहे. जर तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खरच आनंदाची ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या सोन्याच्या किमतीत कालपासून ब्रेक लागलेला दिसत आहे. आजही दरात मोठी घट नोंदवली गेली असून, विशेषता 24 कॅरेट सोन्याचा दरात तब्बल 490 रुपयांनी घसरण झालेली आहे. ही बातमी सोन खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक असली, तरी यामध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांसाठी ही चिंता वाढवणारी बाब आहे. Gold Price Today Maharashtra
आजचे सोन्याचे दर (Gold Price Today 16 July 2025)
आज 24 कॅरेट सोन ₹99,280 प्रति तोळा या नव्या दरावर स्थिरवले आहे, तर 22 कॅरेट सोन ₹91,000 आणि 18 कॅरेट सोनं ₹74,460 या दराने विकले जात आहे.
सोन्याच्या दरात घट का?
जागतिक बाजारात डॉलर इंडेक्स मध्ये तेजी, तसेच US फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याजदर धोरणे विषयीच्या चर्चामुळे सोन्याच्या दरावर दबाव निर्माण झाला आहे. यामुळे भारतातही त्याचा परिणाम दिसून येतो. तज्ञांच्या मध्ये, लवकरच ही घसरण तात्पुरती असून पुन्हा एकदा दरवाढीचा प्रवास सुरू होऊ शकतो.
चांदीतही मोठा बदल
दुसरीकडे चांदीच्या दरात देखील चढ उतार सुरू आहे मंगळवारी चांदीचा भाव तब्बल ₹3000 रुपयांनी घसरून ₹1,12,000 रुपये प्रति किलो वर आला. याआधी सोमवारी चांदिने ₹5,000 रुपयांची उडी मारत ₹1,15000 चा उंचांक गाठला होता. त्यामुळे चांदीतील गुंतवणूकदार सध्या सावध पवित्रा घेत आहे.
सोन खरेदी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या ग्राहकांसाठी हे योग्य वेळ असल्याच सोनार संघटनेचे मत आहे. मात्र गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहता सध्या स्थिती थोडीशी अनिश्चित असल्यामुळे खरेदी करताना थोडासा तज्ञांचा सल्ला घ्या.
हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती