Gold Price Today: सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या किमतीत आज मोठी घसरण झाली आहे. 25 जुलै 2025 रोजी दहा ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याचे दर सातत्याने घसरत असून, 25 जुलै 2000 25 रोजी मौल्यवान धातूच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. काल 24 जुलै 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 100 ग्रॅम मागे तब्बल 13 हजार 600 रुपयांनी घसरली होती. आज 25 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये शंभर ग्रॅम मागे 4900 रुपयाची मोठी घसरण झाली आहे.
त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी आणि दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ज्या गुंतवणूकदारांनी सोन्यात आधीच गुंतवणूक केली आहे त्यांना थोडा नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. सोन्याच्या किमतीत घसरण झाले असली तरी चांदीच्या किमतीत आज स्थिरता दिसून आली आहे. काल चांदीच्या किमतीत प्रति किलो हजार रुपयांची घट झाली होती पण आज त्यामध्ये कोणताही बदल झाला नाही. आता आपण 25 जुलै 2025 रोजी सोन्याचे आणि चांदीचे नवीन दर काय आहेत जाणून घेऊया.
हे पण वाचा| लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधणाला डबल गिफ्ट, जुलै-ऑगस्ट महिन्याचे ₹3,000 एकत्र मिळू शकतात?
शहरानुसार आजचे सोन्याचे दर
18 कॅरेट सोन्याची किंमत:
मुंबई पुणे नागपूर ठाणे कोल्हापूर जळगाव या प्रमुख शहरांमध्ये आज 18 कॅरेट सोन्याचा भाव 75 हजार 360 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.
नाशिक लातूर वसई विरार भिवंडी या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याचा दर 75 हजार 390 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा दर
- मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये बावीस कॅरेट सोन्याचा भाव 92 हजार 100 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.
- नाशिक लातूर वसई विरार भिवंडी या शहरांमध्ये बावीस कॅरेट सोन्याचा दर 92 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.
हे पण वाचा| पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत दररोज ₹340 गुंतवा आणि मिळवा 7 लाख रुपयांचा नफा..
24 कॅरेट सोन्याचा दर
- मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 480 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.
- नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 5 हजार 100 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.
आजचे चांदीचे दर
चांदीच्या किमतीत गेल्या काही दिवसापासून चढ-उतार सातत्याने होत आहे. सात-आठ दिवसांपूर्वी चांदीचा भाव 1 लाख 13 हजार 900 रुपये प्रति किलो एवढा होता. जो 19 जुलै 2025 रोजी वाढून 1 लाख 16 हजार रुपये प्रति किलो एवढा झाला. त्यानंतर 22 जुलै 2025 रोजी यामध्ये पुन्हा वाढ होऊन 1 लाख 18 हजार रुपये प्रति किलो एवढा झाला. 23 जुलै 2025 रोजी एक लाख एकोणीस हजार रुपयांवर गेला. त्यानंतर काल 24 जुलै 2025 रोजी चांदीचा दर ₹1000 रुपयांनी घसरला आणि 25 जुलै 2025 रोजी चांदीचा दर 1 लाख 18 हजार रुपये प्रति किलो एवढा आहे.