Gold Price Today: जर तुम्ही लग्नासाठी किंवा सणासाठी सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दारात सातत्याने वाढ होत होती मात्र आज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्यामुळे ग्राहकांनी खरेदी कडे आतुरतेने शिरकाव केला आहे. सोन्याच्या दरामध्ये झालेली लक्षणीय घट ज्यामुळे सोने खरेदी करणे अत्यंत फायदेशीर ठरत आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.
हे पण वाचा | SBI मध्ये 2 लाख रुपयांच्या FD वर किती परतावा मिळेल? जाणून घ्या सविस्तर माहिती…
सोन्याच्या दरात मोठी घसरण
सोन्याला नेहमीच एक सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशांतर्गत बाजारात सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या असंख्य आहे. विविध देशातील तणाव आणि युद्धासारख्या परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात वाढ होताना दिसते. विशेष इराण आणि इजराइल यांच्यातील वाढत्या तणावामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. 14 जून रोजी सोन्याचे दर एक लाख रुपयांच्या पार पोहोचले होते. त्यानंतर थोडेफार कमी होऊन ते 99 हजार रुपयांच्या आसपास स्थिर झाले आहेत.
दरम्यान सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज सोन्याच्या भावात तब्बल दोन हजार रुपयाची घसरण झाली आहे. ज्यामुळे सोने 97 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. मागील तेरा दिवसात हा सोन्याचा दर सर्वात कमी झाला आहे. या घसरणीमुळे सोने खरेदी करणाऱ्यांची इच्छा असलेल्या ग्राहकांना सोने खरेदी करण्याची मोठी संधी मिळाली आहे.
हे पण वाचा| राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज..! या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी…
आजचे सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचे दर: आज 24 कॅरेट सोन्याचे दर 98 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहेत. कालच्या दरापेक्षा आज यामध्ये 270 रुपयाची घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट आठ ग्रॅम सोन्याचा दर 79 हजार 160 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचे दर: 22 कॅरेट सोन्याचा दर 90 हजार 700 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. या दरामध्ये 250 रुपयाची मोठी घसरण झाली आहे. आज 22 कॅरेट आठ ग्रॅम सोन्याचे दर 72 हजार 560 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहेत.
18 कॅरेट सोन्याचे दर: 18 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये आज 210 रुपयाची मोठी घसरण झाली आहे. हे दर 74, 210 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहेत. 18 कॅरेट आठ ग्रॅम सोन्याचे दर 59,368 रुपये एवढे आहे.
हे पण वाचा| तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती निधी खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर जाणून घ्या सर्व माहिती..
चांदीच्या दारातही घट
सोन्या सोबत चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज चांदीच्या दरामध्ये पाचशे रुपयाची मोठी घसरण झाले आहे आणि एक किलो चांदी एक लाख 7 हजार रुपये एवढी झाली आहे. सोन्या चांदीच्या दरातील ही घसरण ग्राहकांना मोठा दिलासा देत आहे.
हे पण वाचा| लाडक्या बहिणींना गुंतवणुकीसाठी खास 3 योजना; मिळेल जबरदस्त फायदा, जाणून घ्या
सोन्यात गुंतवणूक करणे योग्य की अयोग्य?
सोन्यात नेहमीच एक उत्कृष्ट आणि चांगला परतावा मिळतो. सोन्यामध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते त्यामुळे आर्थिक अस्थिरतेच्या काळात सोन्याचे महत्त्व अधिक वाढते. तज्ञाच्या मते सोन्याची दर आता इथून पुढे वाढतच राहणार आहे त्यामुळे सोने ही तुमच्यासाठी चांगले गुंतवणूक ठरू शकते. सध्याच्या स्थितीत सोन्यामध्ये झालेली घसरण सोने खरेदीसाठी चांगली संधी मानली जाते. सध्या सोन्याच्या दरात झालेली घसरण सोने खरेदी करण्यासाठी योग्य वेळ आहे. गुंतवणूक दराने सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी या संधीचा फायदा घ्यावा. सनासुदीच्या काळात किंवा लग्नसराईच्या काळामध्ये सोन्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
1 thought on “सोन्याच्या दर 2,700 रुपयांनी घसरले; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत..”