Gold Price Today : सोन्याच्या भावात मोठा बदल; जाणून घ्या काय आहेत नवीन 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर

Gold Price Today : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून सोनं खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये सराफ दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. अशावेळी सोन्याच्या किमतीत चढ-उतार ही सामान्य माणसाच्या खिशावर थेट परिणाम करणारी बाब ठरते. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र असून आठवड्याभरात 4 ते 5 हजारांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे जे ग्राहक मागील काही दिवसांपासून दर कमी होण्याची वाट पाहत होते, त्यांच्यासाठी ही एक सोन्यासारखी संधी आहे. Gold Price Today

दहा दिवसांपूर्वी म्हणजे 8 मे रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन तब्बल 99,600 रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचल होतं. त्यानंतर काही दिवसांमध्ये दरात मोठी घसरण झाली. एप्रिल महिन्याच्या अखेरीस सोन थेट एक लाखाचा टप्पा पार करत गेलो होतो. परंतु त्यानंतर काही तासातच किंमत 98 हाजारांवर आली होती. आठ मे रोजी पुन्हा एकदा नवीन हजार पार झाल्यानंतर आता तेजी टिकली नाही सध्या सोनं तब्बल 95 हजारांवर आला आहे.

18 मे 2025 रोजी सोन्याचे दर काय आहेत?

17 मे रोजी कोणताही बदल न झाल्यानंतर 18 मे रोजी ही काही शहरांमध्ये दर स्थिर आहेत, तर काही ठिकाणी किंचित बदल पाहायला मिळतो. सरासरी पाहता महाराष्ट्रात आज 18 कॅरेटचे दर सुमारे 71,350 ते 71,380 रुपये दरम्यान आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 78,200 ते 87,230 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 95,130 ते 95,160 रुपये दरम्यान आहेत.

मुख्य शहरातील आजचे सोन्याचे दर  ( प्रति दहा ग्रॅम)

  • मुंबई: 18k -₹71,350 | 22k -₹87,200 | 24k -₹95,130
  • पुणे : 18k -₹71,350 | 22k -₹87,200 | 24k -₹95,130
  • नाशिक : – 18k -₹71,350 | 22k -₹87,200 | 24k -₹95,130  
  • नागपूर : – 18k -₹71,350 | 22k -₹87,200 | 24k -₹95,130  
  • जळगाव : – 18k -₹71,350 | 22k -₹87,200 | 24k -₹95,130  
  • ठाणे : – 18k -₹71,350 | 22k -₹87,200 | 24k -₹95,130  
  • कोल्हापूर : – 18k -₹71,350 | 22k -₹87,200 | 24k -₹95,130  

तज्ञांचे मत काय सांगते?

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, आणि स्थानिक मागणी हे घटक सोन्याच्या दरावर थेट परिणाम करत असतात. सध्या जागतिक बाजारात असतील तर असल्यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले आहेत. त्यातील भविष्यात सोन्याचे दर पुन्हा चढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती

Leave a Comment

error: Content is protected !!