Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्याच्या दरात अखेर मोठी घसरण झालेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमती तब्बल मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली होती परंतु आता पुन्हा एकदा घसरण झाल्याने सर्वसामान्यांसाठी एक मोठा दिलासा मानला जात आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत तब्बल चार हजारांची मोठी घसरण झालेली आहे. या घरी नंतर आता दहा ग्रॅम सोन्याचा दर 97 हजार 800 रुपयांवरती पोहोचला आहे. यासोबत चांदीच्या दारात देखील घसरण झाल्याचे पाहिला मिळालं. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, मध्यम कालावधीसाठी सोने सकारात्मक दिसत असल तरी सध्या ट्रम्प यांच्या टरिफ नीतीमुळे सोन्याच्या किमतीत चढउतार सुरू असण्याची शक्यता आहे. Gold Price Today
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर सोन्याच्या दरात मोठा बदल
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि फेडरल रिजर्व चेअरमन बद्दल दिलेल्या विधानानंतर जागतिक बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मागील विक्रमी वाढीनंतर आता सोना आणि चांदी दोन्हीच्या किमती घसरू लागल्या आहे. तीन दिवसातच सोनं तब्बल चार हजार रुपयांनी स्वस्त झाला असून दहा ग्रॅम सोन्याचा दर 97 हजार आठशे रुपयांवरती आला.
चांदीच्या दारात घसरण, MCX वर मोठे चढ उतार
चांदीच्या किमतीत ही घसरण झाली असली तरी MCX वायदा बाजारात काहीसा चढ उतार पाहिला मिळाला. 25 एप्रिल रोजी जून वायदा करार नुसार, सोन्याचा भाव इंट्राडे खेडमध्ये एक टक्क्यांपेक्षा जास्त घसरला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास MCX वर दहा ग्राम सोन्याचा दर 0.96 टक्क्यांनी घसरून 94.991 रुपये इतका झाला होता आणि दिवसाच्या तळात 94500 पोहोचला.
जागतिक व्यापार चर्चेचा परिणाम सोन्यांच्या किमतीवर
चीनने काही अमेरिकेतून वस्तूंवरील टेरीफ कमी करण्याचा विचार करत असल्याचा बातम्या समोर आल्यावर जागतिक बाजारात सोन्याच्या दरात एक टक्क्यांपेक्षा अधिक घसरन झाली. अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार करायला बाबत सकारात्मकता वाढल्यामुळे गुंतवणूकदारांनी नफेखोरी केली आणि त्यामुळे सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. रॉयस्टरच्या अहवालानुसार, चीन काही अमेरिकेतून वस्तूंना 125 टक्के टेरिफ मधून सवलत देऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
डॉलर मजबूत झाल्याने सोने स्वस्त
दुसरीकडे, अमेरिका डॉलर इंडेक्स मध्ये 0.3% वाढ झाल्याने ही सोन्याच्या किमती वरती परिणाम झालेला आहे. डॉलर मजबूत झाल्याने जागतिक बाजारात सोनं परदेशी गुंतवणूकदारांसाठी महाग झाला आहे, त्यामुळे त्याची मागणी काहीशी घटली आहे.
सध्याच्या घडीला सोने खरेदी करणे योग्य का?
तज्ञांच्या मते, मध्यम कालावधीसाठी सोन्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. मात्र ट्रम्प यांच्या ट्रॅरीफ नितीतील होणारे बदल आणि विविध भूराजकीय घडामोडी पाहता, सोने दारात चढ-उतार सुरूच राहतील. त्यामुळे लवकरात लवकर गुंतवणूक करायची असेल तर काळजीपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. सध्या तर घसरले आहेत, त्यामुळे काहींनी सोने खरेदीसाठी ही योग्य संधी वाटत आहे.
हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती