आज पुन्हा सोनं महागलं; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर

Gold Price Today: आज 7 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. भारतात लग्नसराई असल्यामुळे आणि गुंतवणूकदारांचा कल देखील कोणी खरेदीकडे वाढल्यामुळे सोने-चांदीच्या दरामध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे. आज व्हॅलेंटाईन विक सुरू झाला आहे. या आठवड्यात अनेक लोक आपल्या जोडीदारासाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक महागड्या सोन्या-चांदीच्या वस्तू किंवा दागिने खरेदी करत असतात. मात्र व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. नागरिकांचा सोने खरेदी कडे कल वाढल्याने सोने चांदी गगनाला भिडत आहे.

सध्या भारतामध्ये लग्नाचा हंगाम सुरू आहे शिवाय सणासुदीच्या काळ देखील सुरू होत आहे. अशा परिस्थितीत सोने-चांदीचे मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या किमती उसळी घेत आहेत. त्याचबरोबर सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात दुकानांमध्ये गर्दी देखील करत आहेत. दरम्यान तुम्ही जर सराफ बाजारामध्ये मौल्यवान धातूची खरेदी करायला जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. बाजारात जाण्याआधी सोन्या-चांदीची किंमत किती आहे हे जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे.

आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 84 हजार 470 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत देखील 96 हजार 170 रुपये प्रति किलो एवढी झाली आहे. तुम्हाला देखील सोने चांदी खरेदी करायचा असेल तर आज तुमच्या शहरातील बाजारामध्ये सोन्या-चांदीची किंमत काय आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. जेणेकरून तुमची खरेदी दरम्यान कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही किंवा खरेदी करण्यादरम्यान तुमच्या बजेटच्या बाहेर खरेदी होऊ नये त्यामुळे आज सोने व चांदीचा बाजारात काय दर आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

सोने चांदीचे दर

आज सोने चांदीच्या मार्केटमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 84 हजार 650 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 77,115 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याची किंमत 64,880 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. याशिवाय चांदीची किंमत 962 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. एक किलो चांदीची किंमत पाहिली तर 96 हजार 170 रुपये एवढी आहे. Gold Price Today

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर

मुंबई: आज मुंबई शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 77,596 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 84 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

पुणे: आज पुणे शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 84 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याची किंमत 77,596 रुपये एवढी आहे.

नागपूर: नागपूर मध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 77,596 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 84 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

नाशिक: नाशिक मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 77,596 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 84,650 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

दिल्ली: दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 670 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 78 हजार 460 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.

चेन्नई: चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 520 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 78 हजार 310 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

कोलकत्ता: कोलकत्ता मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 78 हजार 310 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 85510 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे.

अहमदाबाद: अहमदाबाद शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 85570 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याची किंमत 78,360 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.

पटना: पटना शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 85,570 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे त्याचबरोबर बावीस कॅरेट सोन्याची किंमत 78360 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.

एक महिन्यापूर्वी किती दर होते?

मागील एक महिन्यापूर्वी 24 कॅरेट सोन्याचे दर 78 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे होते. तर चांदीचे दर 91 हजार 60 रुपये प्रति किलो एवढे होते. मागील एका आठवड्यापूर्वी 24 कॅरेट सोन्याचे दर 82 हजार 310 रुपये एवढा होता. तर चांदीचा दर 94,260 रुपये प्रति प्रति किलो एवढा होता. Gold Price Today

सोन्यातील फरक कसा ओळखावा?

24 कॅरेट सोन्यावर 99.9% शुद्ध असे लिहिलेले असते. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्यावर 91% शुद्ध असे लिहिलेले असते. 22 कॅरेट सोन्यात तांबे चांदी व इतर धातूंचा 9% समावेश असतो. मात्र 24 कॅरेट सोन्यामध्ये इतर कोणत्याही धातूचा समावेश नसतो त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचे दर 22 कॅरेट पेक्षा जास्त असतात. तुम्ही दागिन्यांची खरेदी करत असाल तर दुकानदार तुम्हाला 22 कॅरेट सोनेच विकतात.

Disclaimer: वरील आम्ही दिलेले सोन्याचे दर हे इंटरनेट द्वारे माहिती घेऊन दिलेले आहेत. यामध्ये जीएसटी टीडीएस आणि इतर मेकिंग चार्ज मिळवलेला नाही. त्यामुळे आम्ही दिलेल्या सोन्याच्या दरामध्ये व स्थानिक ज्वेलरच्या सोन्याच्या दरामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो. अचूक दरासाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्स सोबत संपर्क साधा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा

error: Content is protected !!