Gold Price Today : सध्या जागतिक पातळीवरती मोठ्या घडामोडी घडत आहेत याचं परिणाम सोन्याच्या दरावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अमेरिका, इराण आणि इजराइल या देशातील वाढता तणाव लक्षात घेता सोन्याच्या दरावरती मोठा परिणाम होताना पाहायला मिळत आहे. आज MCX वर सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे तर चांदीच्या दरात तेजी आलेली आहे. जागतिक स्तरावर इतक्या घडामोडी घडत असताना देखील सोने आणि चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात बदललेले नाहीत जवळपास 3380 डॉलर आणि चांदी छत्तीस डॉलरच्या स्तरावर स्थिर आहे. Gold Price Today
मित्रांनो तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करताय तर त्यापूर्वी नवीन दर काय आहेत हे आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्यासाठी हा लेख सविस्तरपणे वाचा.
आपण नेहमी काही शुभ मुहूर्तावरती किंवा आपल्या घरामध्ये काही कार्यक्रमानिमित्त सोने खरेदी करण्याचा विचार करतो आता लग्नसराई देखील संपलेली आहे आणि सोन्याचे दर कमी होतील अशी अपेक्षा होती परंतु आता सोन्याच्या दर कुठेही कमी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. थोडासा दिलासा आपल्याला देखील मिळाला आहे, 24 कॅरेट सोन्याचे दर ₹60 रुपयांनी घसरले असून भाव 1,00,690 रुपयांवर पोहोचले आहेत.
दरम्यान, 22 कॅरेट सोन्याच्या दारात 50 रुपयांची घट झाली असून भाव 92,300 रुपयांवर पोहोचलेले आहेत. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 40 रुपयांची घट झाली असून प्रति तोळा भाव 75,520 रुपयांवरती पोहोचलेला आहे.
आज सोन्याचे भाव काय आहेत?
आज १० ग्राम २२ कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 300 रुपये प्रति दहा ग्राम इतकी आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 690 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे तसेच 18 कॅरेट सोन्याची किंमत ७५५२० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
मुंबई पुणे मध्ये देखील सोन्याचे दर बदलले नाहीत. 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 300 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 690 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तसेच १८ कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 520 रुपये प्रति दहा ग्राम आहे.
(Disclaimer | वरील दिलेली माहिती ही प्रसार माध्यमांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार आहे योग दर जाणून घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा.)