सोन्याच्या किमतीत नवीन विक्रम! दरात झाली मोठी वाढ, पहा आजचे 10 ग्रॅम सोन्याचे दर

Gold Price Today: सोन्याच्या किमतीने नवीन विक्रम नोंदवला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चालू असलेल्या आर्थिक आणि राजकीय घडामोडीमुळे सोने चांदीच्या किमती वाढत आहेत. आज सोन्याच्या किमतीने ऐतिहासिक वाढ नोंदवली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात सोन्यावरील आयत शुल्का मध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना वाटत होते की सोन्याचे दर स्थिर राहतील मात्र सोन्याच्या दराने मोठा विक्रम मोडला आहे. Gold Price Today

आज 5 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या किमतीत नवीन उच्चांक गाठला आहे. मागील अनेक दिवसापासून सोन्याच्या दरात वाढ होत होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवशी सोन्याच्या दरात थोड्याफार प्रमाणात घसरण झाली होती. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याने उसळी धरली आहे. आज 24 कॅरेट सोन्याने मागील सर्व विक्रम मोडीत काढून तब्बल 84 हजार 399 रुपये प्रति दहा ग्रॅमची पातळी गाठली आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 79050 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 64 हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. सोन्याच्या किमतीत ही ऐतिहासिक वाढ जगभरात सुरू असलेल्या आर्थिक आणि सोन्याची वाढती मागणी यामुळे झाली आहे.

हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत फक्त एवढी रक्कम गुंतवा आणि मिळवा 2 लाख 54 हजार रुपये नफा

तुम्हा सर्वांना माहीतच असेल सोन्या-चांदीची किंमत आंतरराष्ट्रीय पातळी होणाऱ्या घडामोडी वर आणि सोन्या चांदीच्या मागणीवर अवलंबून असते. सध्या सोन्या चांदीची किंमत गगनाला भिडत आहे. सोने-चदीकडे जगभरातील सर्व गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांची संख्या देखील वाढली आहे. गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणाऱ्या मुळे आणि भारतात सुरू होणाऱ्या लग्नसराईमुळे सोन्या-चांदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. आज सोन्याची किंमत 84 हजार 399 प्रति तोळा एवढी आहे. तुम्ही नेहमी पाहिले असेल सोन्याची किंमत वाढल्यानंतर चांदीची किंमत देखील वाढते. त्यामुळे आज चांदी देखील चांगलीच चमकले आहे. आज चांदीच्या दरात तीनशे सहा रुपयांची विक्रमी वाढ होऊन एक किलो चांदीची किंमत 96 हजार 15 रुपये एवढी आहे. या आठवड्यात आत्तापर्यंत सोन्याचे भाव 1800 रुपये प्रति तोळा आणि चांदीची किंमत 1400 रुपये प्रति किलोंनी वाढली आहे. आज देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी चे दर वाढले आहेत.

हे पण वाचा | रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, हे काम करा अन्यथा रेशन कार्ड होईल बंद!

अमेरिकेतील धोरणांचा देखील सोन्याच्या दरावर मोठा परिणाम होतो. चीन आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झालेली आहे. ट्रम्प यांनी चीन मधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे चीनने देखील त्याचे प्रत्युत्तर दिले आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचा सोन्यात गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. पुण्यात गुंतवणूक करण्यामागे दुसरे कारण म्हणजे ही गुंतवणूक एकदम सुरक्षित आहे. वाढत्या मागणीमुळे सोन्याचे भाव देखील वाढत आहेत. भविष्यात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे कारण येणाऱ्या दिवसात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.

Disclaimer: आम्ही दिलेले सोन्याचे दर हे इंटरनेट द्वारे माहिती घेऊन दिलेले आहेत. यामध्ये जीएसटी मेकिंग चार्ज मिळवलेले नसतात. त्यामुळे आम्ही दिलेल्या सोन्याच्या दरामध्ये व स्थानिक ज्वेलर्सच्य सोन्याच्या दरामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो. अचूक दर जाणून घेण्यासाठी स्थानिक ज्वेलर्सची संपर्क साधा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!