सोन्याचे दर घसरले का वाढले? जाणून घ्या या आठवड्यात 14 ते 24 कॅरेट सोन्याच्या दारात काय झाल्याबद्दल?

Gold Price News: मागील आठवडाभरात सोन्याच्या दरामध्ये मोठे बदल झालेले आपण पाहिले आहेत. मात्र या आठवड्यात सोन्याचे दर वाढले का घसरले? याबद्दल माहिती आपण या लेखामध्ये घेणार आहोत. मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढत होत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासून देखील सोन्याचे दर वाढत्या दिशेनेच निघाले आहेत. या आठवड्यात सोन्याच्या किमतीत प्रति दहा ग्राम मागे दोन हजार रुपयाची वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारामध्ये सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत.

मागील एक वर्षापासून सोन्याचा दर चांगलाच वाढला आहे. फक्त जानेवारी महिन्यातच सोने तब्बल सहा हजार रुपयांनी भाग झाले होते. तर मागील एका वर्षात सोन्याची किंमत 17 हजार रुपयांनी वाढली आहे. सध्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 83 हजार रुपये प्रति दहा ग्राम पेक्षा जास्त आहे. मागील एका आठवड्या बद्दल बोलायचं झाले तर केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरच नाही तर देशांतर्गत बाजार समितीमध्ये देखील सोने खूपच महाग झाले आहे. या काळात सोन्याची किंमत तब्बल दोन हजार रुपयांनी वाढली आहे.

हे पण वाचा | बिझनेस आयडिया असावी तर अशी! दिवसाला फक्त चार-पाच घंटे काम करा आणि कमवा लाखो रुपये?

मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याचा भाव एका आठवड्यात मोठा बदलला आहे. मौल्यवान धातूच्या किमतीत सातत्याने नवीन विक्रम गाठत आहे. एका आठवड्या भरापूर्वी 24 कॅरेट सोन्याचा भाव 82223 रुपये प्रति दहा ग्राम एवढा होता. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने 85 हजार 279 रुपये प्रति दहा ग्राम एवढ्यावर व्यवहार केला आहे. हा सोन्याचा सर्वात मोठा विक्रम आहे. यानंतर व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या किमतीमध्ये घसरण झाली होती. मात्र त्यानंतर 456 रुपयाची वाढ देखील झाली आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर 84 हजार 888 रुपयांवर बंद झाले. त्यानुसार हिशोब केला तर एका आठवड्यात सोन्याचा भाव 2655 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढ्याने वाढले आहेत.

देशांतर्गत बाजार समितीमध्ये सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या अधिकृत वेबसाईट नुसार, स्थानिक बाजारामध्ये सोन्याची किंमत 31 जानेवारी 2024 रोजी 82086 रुपये एवढी होती. जी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी वाढून 84 हजार 700 रुपये एवढी झाली. म्हणजेच या आठवड्यात देशातील बाजार समितीमध्ये 2614 ने सोने महाग झाले आहे.

हे पण वाचा | सोन्याच्या भावात तुफान वाढ! सोनं खरेदी करायचे असेल तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या..

सोन्याचे सध्याचे दर किती?

सध्या बाजारामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 84 हजार 700 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,670 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. 20 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 380 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 68 हजार 610 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. 14 कॅरेट सोन्याची किंमत 54 हजार 630 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोन्याची किंमत ही जीएसटी आणि मेकिंग चार्ज शिवाय आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये मेकिंग चार्ज वेगवेगळ्या असतो. त्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये थोडाफार बदल देखील होऊ शकतो. अचूक दर जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या स्थानिक ज्वालाशी संपर्क साधू शकता. Gold Price News

हे पण वाचा | घरबसल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई-केवायसी कशी करावी? जाणून घ्या सविस्तर..

कोणाच्या किमती अजून वाढू शकतात का?

चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या किमती आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 85 हजार रुपयाची पातळी ओलांडल्यानंतर सोन्याच्या गुंतवणूकदारांमध्ये प्रॉफिट बुकिंग वरचढ ठरू शकतात. अशावेळी भाव घसरून 82000 ते 83 हजार रुपयापर्यंत देखील येऊ शकतात. तर काही तज्ञांनी चालू आर्थिक वर्षात सोन्याची किंमत 86 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्राम पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. एका मोठ्या बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे की सोन्याची किंमत वाढल्या मागे अनेक कारण आहेत. आशा परिस्थितीत येत्या दोन महिन्यात सोन्याच्या दरामध्ये जबरदस्त वाढ होण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “सोन्याचे दर घसरले का वाढले? जाणून घ्या या आठवड्यात 14 ते 24 कॅरेट सोन्याच्या दारात काय झाल्याबद्दल?”

Leave a Comment

error: Content is protected !!