आनंदाची बातमी! सोन्याचे दर 6000 रुपयांनी स्वस्त झाले; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत..

Gold Price News: मागील अनेक दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये होत असल्यामुळे चढउतारामुळे नागरिकांमध्ये चिंता दिसत होती. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या तोंडाचे पाणी पळाले होते. एक तोळा सोन्याचा दर एक लाख रुपयांच्या पुढे गेल्यामुळे अनेक जणांसाठी सोन्यात गुंतवणूक करणे किंवा दागिने खरेदी करणे केवळ एक स्वप्न वाटू लागले होते. मात्र आज सोन्याच्या दारात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे सोने खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या लेखामध्ये आपण आज शहरानुसार सोन्याचे दर जाणून घेणार आहोत.

आज सोन्याच्या किमतीमध्ये प्रति दहा 100 ग्रॅम मागे सहा हजार रुपयाची घट झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरामध्ये देखील दोन हजार रुपयाची मोठी घट झाली आहे. त्यामुळे जे ग्राहक सोन्याच्या दरात घसरण होण्याची वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. जरी सोन्याचे दर अजूनही एक लाख रुपयांच्या वर असले तरी ही घसरण लोकांना दिलासा देणारी आहे. सोन्याच्या किमतीत आणखीन घसरण होण्याची शक्यता देखील बाजारात तज्ञ यांनी वर्तवली आहे.

हे पण वाचा| राज्यात या तारखेपासून मान्सूनचा जोर वाढणार; पंजाबराव डाख यांचा नवीन हवामान अंदाज…

आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर

आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 100480 रुपये एवढे आहेत. कालच्या तुलनेत यामध्ये सहाशे रुपयांची घट झाली आहे. याचा अर्थ जर तुम्ही दहा तोळे सोने खरेदी करत असाल तर तुम्हाला आज सहा हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. आज आठ ग्रॅम सोन्याचा दर 80 हजार 384 रुपये एवढा आहे. यामध्ये देखील 480 रुपयाची मोठी घट झाली आहे. 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जाते आणि ते गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो.

22 कॅरेट सोन्याचे दर

दागिने बनवण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाणारे 22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 92 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. ज्यात 550 रुपयाची मोठी घट झाली आहे. म्हणजे आज 100 ग्रॅम 22 कॅरेट सोने खरेदी केल्यास तुम्हाला पाच हजार रुपयांचा मोठा फायदा होऊ शकतो. आज आठ ग्रॅम सोन्याचा दर 73 हजार 686 रुपये एवढा आहे ज्यामध्ये 440 रुपयाची मोठी घट झाली आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी सोन्यात झालेली ही घट मोठ्या फायद्याचे ठरू शकते.

हे पण वाचा| लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आली मोठी अपडेट समोर…

18 कॅरेट सोन्याचे दर

आज 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 75 हजार 360 रुपये एवढा आहे. यामध्ये 450 रुपयाची मोठी घट झाली आहे. आठ ग्रॅम सोन्याचा दर 60280 रुपये एवढा आहे. यामध्ये 360 रुपयाची मोठी घट झाली आहे. 18 कॅरेट सोने हे कमी कॅरेटचे असल्यामुळे याचे दर 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दारापेक्षा आणखीन कमी असतात.

आजचे चांदीचे दर

सोन्याच्या दारासोबतच चांदीच्या दरात देखील आज मोठी घट झालेली आहे. आज एक किलो चांदीचा दर एक लाख आठ हजार रुपये एवढा आहे ज्यामध्ये कालच्या तुलनेत दोन हजार रुपयाची मोठी घट झाली आहे. 100 ग्रॅम चांदीचा दर 11 हजार रुपये एवढा आहे तर दहा ग्राम चांदीचा दर 1100 रुपये एवढा आहे. चांदीच्या दरातील ही घसरण खरेदीदारांसाठी मोठ्या आनंदाची आहे. Gold Price News

हे पण वाचा| राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा! शाळांनाही सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा सल्ला

सोन्याचे दर घसरण्यामागे काय कारण आहे?

सोन्याचे दर अनेक घटकांमुळे बदलत असतात. ज्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, रुपयांचे मूल्य, मागणी आणि पुरवठा याचा समावेश असतो. आजच्या घसरनिमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील काही घडामोडी किंवा रुपयाच्या मूल्यात झालेली वाढ ही कारणे असू शकतात. मात्र सोने घसरणे मागे काय कारण आहे हे समोर येत नाही. आजची सोन्यातील घसरण नक्कीच खरीदरासाठी उत्तम संधी आहे.

आत्ताच सोने खरेदी करावे का?

दरम्यान सोन्याच्या दरातील घसरणीमुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल सध्या सोन्याची खरेदी करावी का नाही करावी. सोन्यातील ही घसरण तात्पुरते असू शकते. जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता पाहता भविष्यात सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठेवू शकतो. तसेच सणासुदीचे दिवस जवळ येत असल्यामुळे सोन्याची मागणी पुन्हा वाढू शकते आणि पुन्हा दरामध्ये मोठे उसळी निर्माण होऊ शकते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!