Gold Price News: गेल्या काही वर्षापासून सोन्यामध्ये गुंतवणूकदारांना चांगला आकर्षक लाभ मिळत आहे. सोन्याच्या किमतीने गगन भरारी घेतल्यामुळे अनेकांना चांगला परतावा मिळाला आहे. मात्र आता वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या एका अहवालातून सोन्याच्या भविष्यातील वाटचालीबद्दल महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. जे गुंतवणूकदारांसाठी विचार करण्यासारखे आहेत. तुम्ही देखील सोने खरेदी करून यामध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
सोन्याच्या किमती घसरण्याची शक्यता?
सध्या सोन्याच्या किमती उच्चांक पातळीवर आहेत. तरी काही दिवसात यामध्ये मोठी घसरण होऊ शकते. असे कौन्सिलच्या अहवालामध्ये म्हटले आहे. यातील प्रमुख घटक खालील प्रमाणे दिले आहेत.
- राजकीय आणि व्यापारी जोखीम कमी झाल्यास: जगभरातील राजकीय अस्थिरता आणि व्यापारी युद्धामुळे सोन्याला नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. जर ही जोखीम कमी झाली आणि आंतरराष्ट्रीय संबंध सुरळीत झाले तर सोन्याची मागणी घटू शकते ज्यामुळे किमतीमध्ये घसरण होऊ शकते.
- अमेरिकन डॉलर आणि ट्रेझरी यील्ड मध्ये वाढ: अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यास किंवा अमेरिकेच्या ट्रेझरीयील्स मध्ये वाढ झाल्यास सोन्यावरील दबाव वाढतो. डॉलर मध्ये गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर वाटल्यास सोन्याची मागणी कमी होते.
- मध्यवर्ती बँकेकडून खरेदीत घट: गेल्या काही वर्षापासून जगभरातील मध्यवर्ती बँकेने मोठ्या प्रमाणात सोन्याचे खरेदी केली आहे. ज्यामुळे त्यांच्या किमतींना आधार मिळाला होता. जर या बँकांनी खरेदीला शितलता आणली तर कमी किमती होऊ शकतात.
- सामान्य गुंतवणूकदाराकडून कमी मागणी: सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे अनेक सामान्य गुंतवणूकदार आता सावध झाले आहेत. त्यांना आता सोन्यात गुंतवणूक करणे नुकसानीचे असू शकते असे वाटू लागले आहे. जर सामान्य लोकांनी सोन्यातील गुंतवणूक कमी केली तर बाजारातील मागणी कमी होऊ शकते.
हे पण वाचा| पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे ₹2,000 या तारखेला खात्यात जमा होऊ शकतात. जाणून घ्या सविस्तर ..
सोन्याच्या किमतीत वाढ होण्यामागे कारणे काय?
तीन नोव्हेंबर 2022 रोजी सोन्याचा भाव प्रति औंस 1429 अमेरिकन डॉलर या सर्वात कमी पातळीवर होता. त्यामध्ये दुप्पट वाढवून 327 अमेरिकन डॉलर प्रति औंस झाला आहे. म्हणजेच गेल्या काही वर्षात सोन्याचे वार्षिक दर सुमारे 30% वाढले आहेत. यानुसार सोन्याचे दर वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. Gold Price News
- युद्धजन्य परिस्थिती: रशिया युक्रेन युद्ध मध्यपूर्वतील तणाव आणि इतर जागतिक घडामोडीमुळे अनिश्चितता वाढली ज्यामुळे सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते.
- मध्यवर्ती बँकांकडून विक्रमी खरेदी: अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढवला ज्यामुळे बाजारात सोन्याची मागणी वाढली.
- महागाईचा परिणाम: महागाई वाढल्याने पैशाची खरेदी शक्ती कमी होते अशावेळी महागाईपासून संरक्षण म्हणून अनेक गुंतवणूकदार सोन्याला प्राधान्य देतात.
गुंतवणूकदारांनी काय करावे?
सोन्याच्या किमतीतील ही अस्थिरता गुंतवणूकदारासाठी आव्हानात्मक ठरू शकते. एकीकडे सोन्याचे दर चांगले वाढले असले तरी दुसरीकडे भविष्यात सोन्याचे दर घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीच्या निर्णयापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरू शकते. दररोज बाजारातील होणारी घडामोडीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.