Gold New Price Today: 15 जुलै 2025 रोजी सोन्याचे किमतीत लक्षणीय घट झाली आहे. यामुळे सोन्याच्या खरीदरांसाठी दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दारात सातत्याने वाढ होत होती. यामुळे अनेक ग्राहकांनी खरेदी करणे टाळले होते. मात्र आजच्या घसरणीमुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, बाजारात खरेदीदारांची गर्दी वाढली आहे. येत्या काळात सोन्याचे दर आणखीन खाली येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अन्नधान्य इंधन आणि कपड्यासह इतर वस्तूंच्या किमती वाढल्या असताना सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. ग्राहक किंमत निर्देशांक महागाईच्या आकडेवारीनुसार, जूनच्या सुरुवातीला सोन्याची किंमत सुमारे 30% ने वाढली होती. या वाढीमुळे बाजारात एक प्रकारची अशांतता निर्माण झाली होती. मात्र आजच्या दर घसरणीने बाजारात पुन्हा एकदा उत्साह पाहायला मिळत आहे. Gold New Price Today
हे पण वाचा| 7 हजार लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत ₹1500; या महिलांना अपात्र का केलं?
आजचे सोन्याचे दर:
आज 15 जुलै 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 11 रुपयांनी घसरून 9977 रुपये प्रति ग्रॅम झाला आहे. दहा तोळे सोन्याची किंमत 1100 रुपयांनी कमी होऊन 9 लाख 97 हजार 700 रुपये झाली आहे. एक तोळा 24 कॅरेट सोन्याची किंमत 99770 रुपये एवढी आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति ग्रॅम दहा रुपयांनी घसरून 9,145 रुपये झाला आहे. तर 18 कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा दर आठ रुपयांनी घसरून 7483 रुपये झाला आहे. सोन्याच्या या घसरणीमुळे ज्यांना सोने खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी निर्माण झाली आहे.
सोन्याच्या दारात जरी घसरल झाली असली तरी चांदीचे दर मात्र वाढले आहेत. आज प्रति ग्रॅम चांदी चार रुपयांनी वाढवून 119 रुपये झाली आहे. विशेष म्हणजे प्रति किलो चांदी तब्बल चार हजार रुपयांनी वाढली आहे. एक किलो चांदीचा दर एक लाख 19 हजार रुपये झाला आहे. औद्योगिक मागणीत वाढ झाल्यामुळे गेल्या आठवड्यातही चांदीचे दर वाढले होते आणि या आठवड्यातही यामध्ये वाढ कायम असल्याचे दिसत आहे.
एकंदरीत सोन्याच्या दरातील घसरणीमुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी चांदीच्या वाढत्या किमतीमुळे अजूनही ग्राहकांमध्ये चिंतेचा संचार होत आहे. आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ ठरू शकते.
1 thought on “सोनं खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात 1,100 रूपयांची मोठी घसरण; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे भाव”