Gold New Price: तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. आज 24 जून 2025 रोजी सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाली आहे. ही घसरण सलग दुसऱ्या दिवशी झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये सोन्याची किंमत एक लाख रुपयांच्या पार गेली होती. मात्र सोन्याने ती पातळी सोडली असून सोन्याचे दर आता कमी झाले आहेत. आजची ही बातमी सोने खरेदीदारांसाठी एक सुवर्णसंधी बनू शकते.
आज 24 जून 2025 रोजी सोन्याच्या विविध कॅरेटच्या किमतीमध्ये लक्षणीय घट झाल्याची दिसत आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 610 रुपयांनी घसरली आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 750 रुपयांनी घसरली आहे. सर्वात शुद्ध मानले जाणारे 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम मागे तब्बल 820 रुपयांनी घसरली आहे. सोन्याच्या दरातील ही घसरण निश्चितपणे सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी बनू शकते. मात्र या घसरणीमुळे ज्या गुंतवणूकदारांनी उच्च दरात सोन्याच्या किमतीत गुंतवणूक केली होती त्यांना तात्पुरता फटका बसला असून भविष्यात त्यांना मोठा फायदा होऊ शकतो.
हे पण वाचा|1 ऑगस्टपासून 7/12 उताऱ्यासंदर्भात नवीन नियम लागू होणार! शेतकऱ्यांना मिळणार नवीन फायदा; वाचा सविस्तर
राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर किती?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 24 जून 2025 रोजी 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत हे आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव:
या महत्त्वाच्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 99870 इतके आहेत. शुद्धतेच्या दृष्टीने थोडे कमी असलेले 18 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 910 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहेत. त्याचबरोबर दागिने बनवण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे 22 कॅरेट सोन्याचे दर 91 हजार पाचशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहेत. Gold New Price
हे पण वाचा|26 जूननंतर या जिल्ह्यात पडणार धो-धो पाऊस! जाणून घ्या पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज…
नाशिक, लातूर, वसई–विरार, भिवंडी:
या शहरांमध्ये सोन्याचे दर वरील शहराच्या तुलनेत थोडे जास्त आहेत. नाशिक लातूर वसई विरार आणि भिवंडी येथे 24 कॅरेट सोन्याचे दर 99 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहेत. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याचे दर 74 हजार 940 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहेत. बावीस कॅरेट सोन्याचे दर 91 हजार 580 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहेत. दरातील हा थोडा फरक स्थानीक बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्यावर आधारित असू शकतो. Gold New Price
हे पण वाचा|शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! सौर कृषी पंप धारकांच्या अडचणीवर मिळणार तात्काळ उपाय, शेतकऱ्यांना या सुविधा मिळणार..
सोन्याचे दर घसरण्यामागे काय कारण आहे?
सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार हा होत असतो यामध्ये मुख्य कारण जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक घडामोडी असतात. अमेरिकन डॉलरचे मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जागतिक शेअर बाजारातील स्थिती व राजकीय तणाव आणि देशातील सोन्याच्या मागणी पुरवठा या सर्व घटकावर सोन्याच्या किमती अवलंबून असतात. सध्याची घसरण ही जागतिक बाजारातील काही सकारात्मक घडामोडीमुळे किंवा डॉलरच्या मजबूत स्थितीमुळे असू शकते. ज्यामुळे सोन्याची सुरक्षित गुंतवणूक म्हणून असलेली मागणी थोड्या प्रमाणात कमी होत आहे.
हे पण वाचा|महाराष्ट्रात पावसाची विश्रांती! आता पुन्हा कधी येणार पाऊस? हवामान विभागाने काय सांगितले? पहा सविस्तर…
सोन्याच्या दरात झालेली ही घसरण निश्चितपणे खरीदरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. येत्या काळात सण समारंभ आणि लग्नसराईचा हंगाम सुरू होईल अशावेळी सोन्याचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आणि कुटुंबीयांना लग्नासाठी सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतात त्यावेळी ही घसरण त्यांच्या फायद्याची ठरू शकते. दुसरीकडे जा गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे, त्या गुंतवणूकदारांना थोडाफार प्रमाणात तोटा सहन करावा लागणार आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक नेहमीच सुरक्षित मानली जाते. पण त्यांनाही आपत्कालीन चढ-उतार येऊ शकतात अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी संयम बाळगणे महत्त्वाचे असते.
आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये सोन्याच्या किमती नेहमीच चांगल्या परताव देत असतात. त्यामुळे आपत्कालीन घसरणीमुळे घाबरून न जाता सोन्यामध्ये गुंतवणूक कायम ठेवणे महत्त्वाचे असते. सोन्याच्या किमतीत हे बदल बाजारपेठेतील गतिशीलतेचे प्रतीक आहे. येत्या काळात सोन्याचे दर कसे राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तरी सध्या सोन्याची खरेदी करण्याचा विचार करण्यासाठी ही निश्चित चांगली वेळ मानली जात आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ ठरू शकते.