Gold Jewellery Price: मागील काही दिवसापासून सोन्याचे दर गगनाला भिडले होते. ज्यामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा परिणाम होताना दिसत होता. मात्र आज आठ जुलै 2025 रोजी भारतीय सराफ बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये मोठा चढ-उतार होताना दिसत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरामध्ये देखील आज बदल झाल्याचे समोर आले आहे. तुम्ही देखील सोने चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी नक्कीच फायदा असा ठरू शकतो. सोन किंवा चांदी खरेदी करण्यापूर्वी आज सोन्याचे दर काय आहे हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
आजच्या सोन्याच्या मार्केटच्या माहितीनुसार, आज देशात दहा ग्राम 24 कॅरेट सोन्याचा दर 97 हजार 580 रुपये एवढा आहे. त्याचबरोबर दागिन्यासाठी सर्वात जास्त वापरलेले 22 कॅरेट सोन्याचा दर 89 हजार 448 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. मुंबई परिसरात त्याचबरोबर एक किलो चांदीचा दर एक लाख 8 हजार 340 रुपये एवढा असून दहा ग्रॅम चांदीचा दर 1,083 रुपयांना मिळत आहे.
प्रत्येक शहरात उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामध्ये फरक असतो त्यामुळे देशभरातील वेगवेगळ्या शहरात सोन्याच्या किमतीमध्ये थोडाफार फरक आढळू शकतो. त्यामुळे तुमच्या शहरात नेमके सोन्याचे दर काय आहेत हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. Gold Jewellery Price
हे पण वाचा| आता कॅश डिपॉजिटसाठी बँकेत जायची गरज नाही, ATM मधून UPI ने जमा करता येणार पैसे; जाणून घ्या संपूर्ण
प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर
- मुंबई: 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर 89,283 रुपये एवढा आहे. 24 कॅरेट 10 gm सोन्याची किंमत 97 हजार 400 रुपये एवढा आहे.
- पुणे: 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 283 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
- नागपूर: 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 283 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
- नाशिक: 24 कॅरेट सोन्याचा दर 97 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 283 रुपये एवढी आहे.
Disclaimer: वरील सोन्याचे दर केवळ इंटरनेट द्वारे माहिती घेऊन दिलेले आहेत. यामध्ये जीएसटी टीडीएस आणि इतर करांचा समावेश केलेला नाही. अचूक दरासाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.
सोने खरेदी करताना 22 कॅरेट खरेदी करावी का 24 कॅरेट खरेदी करावे असा प्रश्न पडला असेल तर या दोन्हीमध्ये नेमकं फरक काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 99.9% शुद्ध असते. हे सोने पूर्णपणे सुद्धा असल्यामुळे याचे दागिने तयार करता येत नाहीत हे केवळ गुंतवणूक म्हणून अनेक जण खरेदी करतात. 22 कॅरेट सोने हे 91% सुद्धा असते यामध्ये तांबे चांदी जास्त यासारख्या नऊ टक्के इतर धातूंना मिसळवलेले असते. यामुळे सोने थोडे कठीण होते आणि त्याचे सुंदर दागिने तयार करता येतात. बहुतेक दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.
1 thought on “सोन्या-चांदीच्या किमतीत आज मोठा बदल! जाणून घ्या दहा ग्रॅम सोन्याचे नवीन भाव..”