Former ID: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र हे अनिवार्य केले आहे. त्यामुळे सध्या शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी शेतकऱ्यांची सीएससी केंद्रावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र असणे आवश्यक केले आहे. ह्या ओळखपत्राचे काय काम आहे? या ओळखपत्राद्वारे काय फायदा मिळणार याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय?
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे चालवण्यात जाणाऱ्या ऑग्रीस्टॉक प्रकल्पाचा शेतकरी नोंदणी करणे हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना थेट सरकारी योजनेचा कृषी कर्ज चांगल्या प्रकारचे बियाणे आणि इतर सरकारी फायदे मिळवून देणे हा आहे. Former ID
हे पण वाचा | राज्य शासनाचा मोठा निर्णय! या शेतकऱ्यांना रेशनऐवजी मिळणार पैसे; पहा सविस्तर माहिती
शेतकरी नोंदणी म्हणजे काय?
शेतकरी नोंदणी म्हणजे भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची ऑग्रीस्टॉक प्रकल्प अंतर्गत एक उपक्रम चालवला जात आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांची लोकसंख्या, शास्त्रीय माहिती, त्यांच्या जमिनीची सर्व माहिती, प्रत्येक शेतीच्या जागेचे सॅटॅलाइट द्वारे निर्देशांक, शेतकऱ्यांच्या जमिनीवर पेरलेल्या पिकांची माहिती, इत्यादी माहिती डिजिटल पद्धतीने संग्रहित केली जात आहे. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला आधार क्रमांकाप्रमाणे 11 अंकी युनिक आयडी म्हणजेच युनिक शेतकरी आयडी दिला जातो. यामुळे शेतकरी त्यांची ओळख डिजिटल पद्धतीने मार्जिन पडताळून घेऊ शकतात. राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मालकीच्या खसऱ्यांचा समावेश करून या प्रक्रियेत मोबाईल ॲप्लिकेशन आणि वेबसाईट द्वारे शेतकऱ्यांच्या आधार कार्ड सोबत जोडले जाणार आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! फेब्रुवारीचा हप्ता या तारखेला मिळणार
शेतकरी ओळखपत्राचा फायदा काय?
- शेतकरी ओळखपत्र तयार केल्यानंतर कोणत्याही कागदपत्राशिवाय सरकारी योजनेचा शेतकऱ्यांना फायदा घेता येणार आहे.
- राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना थेट देण्यासाठी शेतकरी ओळखपत्र असणे आवश्यक असणार आहे.
- पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना त्यासोबतच इतर शेतीसंबंधीतील योजनेमध्ये आपोआप सामील होता येणार आहे.
- किमान आधारभूत किंमत आणि इतर योजना अंतर्गत शेतकऱ्यांकडून योग्य दरात पिके खरेदी करून घेणे शक्य होणार आहे.
- शेतकऱ्यांच्या पिकानुसार पिक विमा डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
- शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड कर्ज सहजपणे आणि जलद गतीने देता येणार आहे.
- शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी विविध सेवा आणि बाजारपेठेचा लाभ देखील याद्वारे घेता येणार आहे.
- शेतकरी त्यांच्या पिकाच्या मातीच्या परिस्थितीनुसार आणि कृषी हवामानाच्या परिस्थितीनुसार योग्य सल्ला घेऊन शेती करू शकतात.
- सरकारी योजनेमध्ये योग्य शेतकऱ्यांना योग्य लाभ वाटवण्यास मदत होईल. देशातील कोणताही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना त्यांची ओळख पटवून देणे अगदी सोप्या पद्धतीने शक्य होणार आहे.
- येणाऱ्या काळात जमिनीची खरेदी विक्री नोंदणी प्रक्रियासाठी देखील शेतकरी ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा | किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळत आहे 5 लाख रुपये कर्ज; अर्ज कसा करावा? पहा सविस्तर..
आर्थिक लाभ देणाऱ्या योजना मिळणार नाहीत
जर तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढले नाही तर तुम्हाला केंद्र सरकार अंतर्गत व राज्य सरकार अंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या योजना बंद होऊ शकतात. तुमच्याकडे किसान ओळखपत्र नसल्यास तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र याची अंमलबजावणी लगेच होणार नाही तर याचे अंमलबजावणी 20 व्या हप्त्यापासून होणार आहे. त्याचबरोबर पी एम किसान योजनेच्या धर्तीवर बनवलेली नमो शेतकरी योजनेचा लाभ देखील शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे देशातील सर्व शेतकऱ्यांनी त्वरित आपले शेतकरी ओळखपत्र काढून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमचा आर्थिक तोटा होणार नाही. Former ID
शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?
- आधार कार्ड
- सातबारा, आठ अ
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
हे पण वाचा | शेतकऱ्यांच्या खात्यात 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये या दिवशी जमा होणार; यादीत तुमचे नाव आहे का नाही?
शेतकरी ओळखपत्र कसे काढावे?
शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ऑग्रीस्टॉक या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. शेतकरी ओळखपत्र तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील काढू शकता त्यासाठी तुम्हाला जवळच्या कृषी कार्यालयात किंवा तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज सादर करावा लागेल. मात्र आपण ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करावा याबद्दल माहिती घेणार आहोत.
- ऑग्रीस्टॉक वेबसाईटवर जाऊन शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरून आपले कागदपत्र अपलोड करा.
- अर्ज सबमिट करून पावती डाऊनलोड करा.
- शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची फीस लागत नाही.
- अर्ज सादर केल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला तुमचे ओळखपत्र मिळेल.
- तुम्हाला मिळालेल्या ओळखपत्रावर तुमचा फोटो नाव पत्ता आणि इतर आवश्यक माहिती असते.
- हे ओळखपत्र तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.
2 thoughts on “शेतकरी ओळखपत्राचे फायदे काय? ओळखपत्र कसे काढावे? जाणून घ्या सविस्तर माहिती”