Farmer ID : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! शेतकरी ओळखपत्र मिळण्यास सुरुवात, या पद्धतीने डाऊनलोड करा

Farmer ID : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज समोर आलेली आहे. आता सरकारी अनुदाने मिळवण्यासाठी शासनाने शेतकरी ओळखपत्र (Farmer Identity Card) लागू केलेले आहे. तर हे पत्र शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झालेले आहे. याचे अधिकृत संदेश शेतकऱ्यांना येऊ लागलेले आहेत. आता हे फार्मर आयडी कसे डाउनलोड (How to download farmer identity card) करायचे असा प्रश्न निर्माण होत आहे. चला तर जाणून घेऊया याची सविस्तर माहिती. Farmer ID

शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी महत्त्वाची ! (Farmer ID is important for farmers!)

शासनाने, शेतकऱ्यांना योग्य प्रकारे अनुदान (Identity card is important to get government subsidy) देण्यासाठी एक महत्त्वाचे उपक्रम राबवले आहे. या उपक्रमाचे नाव ॲग्री स्टिक आहे. या योजनेअंतर्गत फार्मर आयडी कार्ड सुरू केले आहे. या कार्ड मार्फत शेतकऱ्यांची जमिनीची माहिती शासनाने मिळते. ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते.

त्या कार्डाचे अनेक फायदे देखील आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. जसे की पिकांचे उत्पादन, बाजार भाव, मालकी हक्क इतर शेती संबंधित माहिती एका ठिकाणी संकलित केली जाणार आहे. हे कार्ड शेतकऱ्यांना भविष्यात खूप महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे कृषी संबंधित योजनेचा लाभ मिळणार आहे.

फार्मर आयडी अशाप्रकारे करा डाऊनलोड (Download Farmer ID like this

  • सर्वप्रथम https://apfr.agristack.gov.in/farmer-registry-ap/#/checkEnrolmentStatus या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा. जर तुम्ही यापूर्वीच नोंदणी केली असेल तर आधार क्रमांक टाकावा लागेल. आणि तुमचा फार्मर आयडी स्क्रीनवर दिसेल. सध्या यामध्ये दुरुस्तीचा पर्याय नाही त्यामुळे आधी दिलेली माहिती दाखवली जाईल.

फार्मर आयडीची पीडीएफ डाउनलोड करा (Download PDF of Farmer ID)

भविष्यातील योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे स्क्रीनवर दिसणाऱ्या “View Details” या पर्यावर क्लिक करून तुमची संपूर्ण माहिती समोर दिलेल्या वरील बाजूस “Generate PDF किंवा Download PDF या पर्यावरण क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये ही पीडीएफ डाउनलोड होईल. तसे तुम्ही याचे कार्ड तयार करून ठेवा भविष्यातील योजनेसाठी याचा उपयोग पडणार आहे.

हे पण वाचा | Farmer ID: शेतकरी मित्रांनो, पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळवण्यासाठी त्वरित फार्मर कार्ड तयार करा

(अशाच अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा)

Leave a Comment

error: Content is protected !!