Fact Check : सोशल मीडिया म्हटलं की, ट्रेंड च्या गोष्टी त्यामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो तो प्रतिसाद परंतु याच ट्रेंड चा उपयोग करून आणि सोशल मीडियाचा वापर करून काही बातम्या देखील सोशल मीडियावरती पसरल्या जात आहेत. सध्या अशीच एक बातमी सोशल मीडियावरती वायरल झालेली आहे. यामध्ये जिओ कंपनीला आठ वर्षे पूर्ण झाल्यामुळे, प्रत्येक ग्राहकाला पाच हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे. लिंक वर क्लिक करा आणि कार्ड स्क्रॅच करा, पैसे तुमच्या खात्यामध्ये लगेच जमा होतील असा दावा देखील करण्यात येतोय. आणि बघता बघता हा मेसेज सर्व मोबाईल वायरल वायर होतोय आणि नागरिक यावरती क्लिक करत आहेत. Fact Check
पण थोडं थांबा! हाच मेसेज खरा आहे का? खरंच अंबानी साहेब आपल्या खात्यात पैसे टाकणार आहेत का? ही जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.
जिओ कंपनीला आठ वर्षे पूर्ण झाले म्हणून प्रत्येक ग्राहकाला पाच हजार रुपये बोनस दिल्या जातोय, असा मेसेज येत आहे. मेसेज मध्ये एक लिंक असते, आणि त्यात असंही लिहिलेलं असतं ही लिंक उघडा आणि कार्ड स्क्रॅच करा आणि तुमच्या खात्यात पैसे लगेच जमा होतील. आणि त्यामध्ये लिंक ओपन केल्यानंतर ही लिंक तुमच्या पाच मित्रांना शेअर करा लगेच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असं देखील सांगण्यात येतं. अशामुळे लिंक ही सर्व सोशल मीडियावरती वायरल होत आहे.
हे पण वाचा | Jio चा भन्नाट प्लॅन, फक्त 26 रुपयांमध्ये मिळतोय! 2 GB डेटा वाचा सविस्तर! Jio Recharge Plan
पडताळणी केल्यावर काय सत्य समोर आलं?
याबाबत आम्ही थोडीशी सत्यता तपासण्याचे प्रयत्न केले तर त्यामध्ये कंपनीने सांगितण्यात आलं की असा कोणताही बोनस किंवा मेसेज पाठवला जात नाही. म्हणजे हा मेसेज बनावट आहे आणि कोणीतरी लोकांची फसवणूक करण्यासाठी ही स्कीम तयार केली आहे. यामुळे अशा गोष्टींना बळी न पडता ही लिंक कोणालाही शेअर करू नका.
सायबर एक्स्पर्ट काय म्हणतात?
सायबर तज्ञ सांगतात की, अशा लिंक वर क्लिक केल्यास तुमच्या मोबाईल मधले बँक माहिती, ओटीपी, पासवर्ड यावर सायबर चोर ताबा मिळतो. त्यामुळे खात्यात पैसे येण्याऐवजी तुमचे पैसे गायब होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा लिंक वरती क्लिक करू नका.
PM Kisan 20 wa instalment keva