Education Loan: आता शैक्षणिक कर्ज विद्यार्थ्यांसाठी घेणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामुळे आता फक्त पंधरा दिवसात कर्ज मिळणे शक्य होणार आहे. जे विद्यार्थी शैक्षणिक कर्ज घेऊन आपले शिक्षण पूर्ण करण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी ही एक दिलासा देणारी बातमी आहे. कारण आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना कर्ज मिळवण्यासाठी एक महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागत होती.
उच्च शिक्षण घेणे आजकाल खूप महाग झाले आहे आणि अनेक विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी लाखो रुपयांचा खर्च परवडणारा नाही. अशा परिस्थितीत एज्युकेशन लोन हा एक महत्त्वाचा आधार ठरतो. अर्थ मंत्रालयाच्या नव्या आदेशानुसार ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. बँकांना केंद्रीकृत क्रेडिट प्रणाली तयार करण्यास सांगितले आहे आणि त्या विद्या लक्ष्मी पोर्टलशी जोडल्या जात आहेत. यामुळे कर्ज अर्जदारांना अनेक बँकांच्या योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल आणि अर्ज करण्याची प्रक्रिया ही सोपी होईल.
या नवीन नियमानुसार जर तुमच्या शैक्षणिक करण्याचा अर्ज कोणत्याही कारणास्तव नाकारला गेला तर त्यांचे कारण तुम्हाला स्पष्टपणे कळवले जाईल. तसेच असे अर्ज फक्त वरिष्ठ अधिकारीच मंजूर करू शकतील. ज्यामुळे प्रक्रियेत अधिक पारदर्शकता निर्माण होईल ही एक सकारात्मक बाब आहे. कारण यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जाची सध्याची स्थिती आणि नाकारण्या मागची कारणे समजून घेण्यास मोठी मदत होईल.
हे पण वाचा| पोस्ट ऑफिसच्या या योजनेत दरमहा ₹2,600 गुंतवा आणि 60 महिन्यात मिळवा इतका रिटर्न?
व्याजदर आणि परतफेडीचा कालावधी किती असेल?
शैक्षणिक कर्जावरील व्याजदर सध्या देशातील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सात ते 16 टक्के पर्यंत आहे. ग्रामीण बँकांमध्ये हे व्याजदर 8.50 ते 13.60% पर्यंत आकारला जातो. उच्च शिक्षणासाठी भारतात 50 लाख रुपयापर्यंत तर परदेशात अभ्यास करणाऱ्यांसाठी एक कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध असते. हे कर्ज पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दिले जाते. कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला 15 वर्षापर्यंतचा कालावधी मिळतो ज्यामुळे विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार मोठा कमी होतो.
विद्यालक्ष्मी योजना काय आहे?
केंद्र सरकारची विद्यालक्षमी योजना ही एज्युकेशन लोन साठी एक अत्यंत उपयुक्त व्यासपीठ आहे. या पोर्टलवर तुम्ही विविध बँकांकडून उपलब्ध असलेल्या कर्जाची माहिती मिळू शकतात. त्याची तुलना करून तुमच्यासाठी कोणते चांगले असेल हे ठरवू शकतात त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणावरून थेट अर्ज देखील करू शकतात. यामुळे तुम्हाला योग्य बँक आणि योग्य कर्ज योजना निवडण्यास मोठी मदत मिळेल. Education Loan
थोडक्यात एज्युकेशन लोन ची प्रक्रिया आता अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने होणार आहे यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना याचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे. ज्यामुळे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणारे अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता तुम्हाला बँकेत जाण्याची जास्त धावफळ करण्याची गरज लागणार नाही. फक्त पंधरा दिवसात तुम्हाला तुमच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेले कर्ज मिळू शकेल.