दिल्लीमध्ये 27 वर्षानंतर भाजपची सत्ता; AAP चा दारुण पराभव!


Delhi Election Results Live : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल 2025 मध्ये भारतीय जनता पक्षाने 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये सत्ता मिळवलेले आहे. या निवडणुकीमध्ये भाजपने 41 जागांवरती विजय मिळवला असून, तर आम आदमी पक्ष 29 जागांवर मर्यादित राहिलेला आहे. काँग्रेसला या निवडणुकीमध्ये एकही जागा मिळवता आलेली नाही. Delhi Election Results Live

निवडणूक आयोगाच्या ( ECI) अधिकृत वेबसाईट नुसार, भाजपा ने 41 जागांवरती आघाडी घेतली आहे. तर आप 29 जागांवर आघाडी वर आहे. दिल्लीची माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भाजपाचे प्रवेश वर्मा यांनी सुरुवातीची आघाडी गमावली आहे. विद्यमान मुख्यमंत्री आतिशी आणि मनीष सिसोदिया देखील पिछाडीवर आहेत. तुम्ही लाईव्ह रिझल्ट निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. येथे दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 च्या मतमोजणीचे थेट निरीक्षण करू शकता.

महत्वाची लढाई

महत्त्वाच्या लढाया मध्ये नवी दिल्लीचे आपचे अरविंद केजरीवाल भाजपचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्याशी सामना करत होते. कालकाजी मतदारसंघात आपच्या आतिशी, काँग्रेसच्या अलका लांबा आणि भाजपचे रमेश बिधुरी यांच्यामध्ये स्पर्धा होती. जंगपुरा मतदारसंघांमध्ये आपचे मनीष सिसोदिया, ओखला मतदारसंघात अमानतुला खान, आणि मालवीय नगरमध्ये सोमनाथ भारती यांची भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांशी स्पर्धा होती.

या निवडणुकीमध्ये भाजपने आपल्या प्रचारात भ्रष्टाचार, पाणी टंचाई, प्रदूषण आणि इतर मुद्द्यांवरती आप सरकार वरती टीका केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रोहिणी येथे आयोजित सभेत आप सरकारला “आपदा” असे संबोधले आणि त्यांच्या कार्यकाळातील आपत्तींची चर्चा केली.

हे पण वाचा | सोन्याच्या दरात तुफान वाढ! जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर

आप पक्षाने महिलांसाठी महिला सन्मान योजना, ज्याअंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. तसेच मंदिर पुजारी आणि गुरुद्वारांना ग्रंथासाठी आर्थिक साह्य योजना जाहीर केली.

काँग्रेस पक्षाने आपल्या प्रचारात प्रदूषण, महागाई बेरोजगारी आणि कचरा व्यवस्थापन या मुद्द्यांवर राज्य आणि केंद्र सरकार वरती टीका केली. त्यांनी दिल्ली न्याय यात्रा आयोजित करून या मुद्द्यावर जनतेशी संवाद साधला.

या निवडणुकीमध्ये एकूण मतदान टक्केवारी 60.54% होती, जी मागील निवडणुकीपेक्षा 2.28% ने कमी आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, मतदान पाच फेब्रुवारी 2025 रोजी झाले, आणि मतमोजणी आठ फेब्रुवारी 2025 रोजी पार पडली.

या निकालानंतर भाजपने दिल्लीतील सत्ता हस्तगत केली आहे आणि आप सरकारला विरोधी पक्षाची भूमिका बजावी लागणार आहे. काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत कोणतीही जागा मिळवता आलेली ज्यामुळे त्यांची स्थिती अधिकच कमजोर झालेली आहे.

दिल्लीतल्या राजकीय बदलामुळे आज आम्ही काळात राजधानीच्या राजकारणात नवीन समीकरणे आणि धोरणे पाहायला मिळतील. भाजपच्या या विषयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तर हा पाणी काँग्रेस पक्षांना आपल्या धोरणांवरती पुनर्विचार करण्याची गरज आहे.

2 thoughts on “दिल्लीमध्ये 27 वर्षानंतर भाजपची सत्ता; AAP चा दारुण पराभव!”

Leave a Comment

error: Content is protected !!