या ४ राशींचा वाईट काळ सुरू होणार; तुमची राशी यामध्ये आहे का? आधीच वाचा आणि खबरदारी घ्या


Daily Horoscope Today : जगात काही घडायचं असेल तर आधी ग्रहांच्या हालचाली बदलतात. आणि आता २८ जुलैपासून असाच एक मोठा बदल होणार आहे, ज्याचा परिणाम थेट ४ राशीच्या लोकांच्या आयुष्यावर होणार आहे. कारण मंगळ ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार असून शनी ग्रहाशी समसप्तक योग बनणार आहे. हा योग फारसा शुभ नाही, आणि काही राशींना मोठ्या संकटात टाकणारा ठरू शकतो. Daily Horoscope Today

ज्यांचं आयुष्य अजून थोडंसं मार्गी लागलं होतं, त्यांना आता पुन्हा नवं आव्हान समोर येण्याची शक्यता आहे. म्हणूनच जर तुमची राशी या यादीत असेल, तर पुढील काही आठवडे अत्यंत सावधगिरीने वागा. कारण नात्यांमध्ये गैरसमज पैशाचं नुकसान, करिअरमध्ये गोंधळ आणि आरोग्याचे त्रास अशी संकटांची मालिका सुरू होण्याची शक्यता आहे.

या चार राशींनी सावध राहा

मीन राशी(Pisces): मीन राशीच्या लोकांसाठी २८ जुलैनंतरचा काळ थोडक्यात म्हणायचं झालं तर ‘ताणतणाव, गैरसमज आणि मानसिक गोंधळाचा’ असणार आहे. कामात अडथळे वाद जवळच्या माणसांशी मतभेद अशी संकटांची मालिका सुरू होऊ शकते. तुमच्यावर विश्वास ठेवणारी एखादी व्यक्ती नाराज होऊ शकते. त्यामुळे काही महत्वाची कामं अडकू शकतात. शांत राहा गोड बोलणं हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल.

धनु राशी (Sagittarius) : धनु राशीच्या लोकांना मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागू शकतो. कामाची जबाबदारी वाढेल पण मनात कायम एक असमाधानी भावना राहील. या काळात आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात आणि काहीजणांवर डोकेदुखी, झोपेचा त्रास तणाव यांचा प्रभाव दिसून येईल. एखादा शत्रू किंवा स्पर्धक कट रचू शकतो, त्यामुळे कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका.

कन्या राशी (Virgo) : कन्या राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. निर्णय चुकण्याची शक्यता अधिक आहे. काही वेळा आपल्या चुकीच्या बोलण्यामुळे जवळचं नातं दुरावण्याची शक्यता आहे. मानसिक थकवा, शरीरातील थकवा हे सुद्धा जाणवेल. कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी विचार करा, संयम ठेवा.

सिंह राशी (Leo) : सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक नुकसानाचं सावट आहे. कुणावरही विश्वास ठेवून गुंतवणूक केल्यास पैसा अडकण्याची शक्यता आहे. या काळात अपयश वारंवार येऊ शकतं. नात्यांमध्ये कटूता वाढेल वाणी कठोर होईल आणि त्यामुळे नको असलेले वाद उद्भवू शकतात. काही गोष्टींचा कंट्रोल तुमच्या हातात नसतो पण बोलण्यावर तरी असेल.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही आणि याबाबत आमच्याकडे कुठलाही पुरावा नाही)

हे पण वाचा | शंभर वर्षांनी बनतोय जबरदस्त योग ! उद्यापासून ‘या’ 3 राशींना होणार धनवर्षा, वाईट काळ संपला आता सुरू होईल सुवर्णकाळ !  

Leave a Comment

error: Content is protected !!