Daily Astrology | वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, येत्या जुलै महिन्यात एक दुर्लभ आणि ऐतिहासिक संयोग घडणार आहे. तब्बल ७२ वर्षांनंतर अशी वेळ येते आहे, जेव्हा एकाच वेळी चार ग्रह वक्री होणार आहेत. ही ग्रहस्थिती केवळ खगोलशास्त्रीय दृष्टीनेच नव्हे तर मानवी जीवनावरही खोलवर परिणाम करणारी आहे. विशेषतः कर्क, वृषभ आणि मीन राशींना या संयोगाचा जबरदस्त लाभ मिळणार आहे. Daily Astrology
🌑 नेमकं काय घडणार आहे?
१३ जुलै २०२५ रोजी न्यायाधीश शनि वक्री होतोय. १७ जुलै ला बुधही वक्री होईल. तर राहू आणि केतू आधीपासूनच वक्री अवस्थेत आहेत. यामुळे चार ग्रहांची वक्र चाल तयार होत असून, ही स्थती काही राशींसाठी शुभतेचा ‘जॅकपॉट’ ठरू शकते. श्रावण महिना आधीच भगवंत शिवाचा मानला जातो, आणि या कालावधीत ग्रहांची उलट चाल यशाचे दार उघडू शकते.
कर्क राशी – वैवाहिक सुख, आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा
या राशीतील जातकांसाठी हे दिवस आयुष्यात मोठे समाधान घेऊन येणार आहेत. विवाहितांना नात्यांमध्ये सुसंवाद निर्माण होईल, अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव मिळतील. सामाजिक सन्मान वाढेल, संवादकौशल्यामुळे व्यावसायिक संधी मिळतील. आर्थिक आघाडीवरही वेळ लाभदायक राहील. खर्चावर संयम ठेवल्यास बचतीचे प्रमाण वाढेल आणि जुने स्वप्नंही पूर्ण होतील.
वृषभ राशी – उत्पन्न वाढ, नवे नातेबंध आणि लोकप्रियता
वृषभ राशीच्या लोकांसाठी वक्री ग्रह सकारात्मक ऊर्जा घेऊन येणार आहेत. नोकरीत पदोन्नतीच्या संधी येतील, जुने वाद मिटतील, आणि समाजात तुमचं महत्त्व वाढेल. व्यावसायिक भागीदारीत फायदा होईल. नव्या गुंतवणुकीसाठीही ही वेळ योग्य असून, कुटुंबासोबत आनंददायी क्षण घालवू शकाल.
मीन राशी – कर्जमुक्ती, व्यवसाय विस्तार आणि प्रेमात प्रगती
मीन राशीसाठी हा काळ सप्तरंगी यशाचा ठरू शकतो. जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल. नवा व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करण्याची वेळ आहे. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल, लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. बेरोजगारांसाठी नोकरीचे योग असून, नोकरी करणाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या आणि पदोन्नती मिळू शकते
(Disclaimer: वरील दिलेली माहिती उपलब्ध माहिती स्त्रोतांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)
हे पण वाचा | राशिभविष्य: आज या राशीसाठी शुभ संकेत; होणार आर्थिक फायदा! जाणून घ्या सविस्तर माहिती