Cyclone Alert | हवामान खात्याने एक मोठा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर जोरदार चक्रवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळाला अल्फ्रेड असे नाव देण्यात आलेले आहे. हे चक्र वादळ गेल्या 50 वर्षातील सर्वात तीव्र चक्रीवादळ मानले जात असून, याचा थेट परिणाम 25 लाख लोकांवर होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे प्रशासन अलर्ट झालेलं आहे. Cyclone Alert
चक्री वादळाचा वेग आणि संभाव्य धोका
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, चक्रीवादळाचा वेग 95 ते 100 किमी इतका असणार आहे. हे चक्र शुक्रवारी मध्यरात्रीच्या शनिवारी पहाटेच्या दरम्यान किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वित्तहानी आणि जीवित हानी होण्याचा धोका वर्तवण्यात आलेला आहे.
चक्रीवादळामुळे समुद्र प्रचंड उंच लाट्या तयार झालेला आहेत, 13.3 मीटर पर्यंतच्या लाटा निर्माण झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. या लाटा मुळे किनारपट्टीवरील गावांना धोका निर्माण झालेला असून, प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनाऱ्या पासून दूर राहण्याचे आवाहन केलेले आहे.
सध्या हे चक्रीवादळ ब्रिस्बेन शहराच्या दिशेने सरकार असून, शुक्रवारी मध्यरात्रीच्या शनिवारी पहाटेच्या दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किणाऱ्या वरती धडकण्याची शक्यता आहे. आसपासच्या भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. प्रशासनाने रेड अलर्ट जारी केलेला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलेले आहे.
चक्रीवादळाच्या ताशी 100 किमीच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे विजाच्या तारा तुटण्याची शक्यता आहे. तर यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. तसेच जोरदार वाऱ्यासह अतिवृष्टी होणार असल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि उकडलेल्या झाडांमुळे आणि खराब हवामानामुळे रस्त्याने हवाई वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासनाच्या उपयोजना
ऑस्ट्रेलियन हवामान विभागाने स्थानिक प्रशासनाने नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात सुरुवात केलेली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये हाताळण्यासाठी विशेष पथके तैनात केलेली आहेत. किनारपट्टी भागात मदत आणि बचाव कार्य सुरू केलेले आहे. तसेच हवामान तज्ञांच्या मते, हे चक्रीवादळ मागील ५० वर्षातील सगळ्यात मोठे चक्रीवादळ आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांनी सुरक्षित तळी जावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
हवामान विभागाने चक्रीवादळ व जोरदार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. किनारपट्टी भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी जात आहे. हवामान विभागांनी सांगितले आहे की, पुढील काही तासांमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातील नागरिकांना चक्रीवादळाच्या काळात सावध राहण्याचे व अनावश्यक प्रवास करण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनाचे पालन केल्यास जीवित हानी टाळता येऊ शकते.
1 thought on “Cyclone Alert | 50 वर्षात सर्वात मोठे चक्रवादळ धडकणार; नवीन हवामान अंदाज पहा”