Cotton soybean farmers : कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता त्यांच्या खात्यावरती हेक्टरी पाच हजार रुपये कमाल दोन हेक्टर पर्यंत अर्थसहाय्य जमा होणार आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Cotton soybean farmers
2023 मध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना निविष्ठा स्वरूपात अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळाले नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. त्यांच्यासाठी रुपये पाच हजार रुपये प्रति हेक्टर, याप्रमाणे कमाल दोन हेक्टर पर्यंत अर्थसहाय्य देण्याची घोषणा सरकारने केली आहे.
अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ?
शासन अंतर्गत हे अनुभव कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणी केली आहे. त्या शेतकऱ्यांना 2023 मध्ये पाहणी पोर्टलवर नोंदणी केल्यामुळे हे शेतकरी पात्र ठरणार आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणी केली नाही, परंतु त्यांच्या 7/12 उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. तसेच, खरीप 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक करणारे वनपट्टेधारक तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती तालुक्यातील नोंदणी नसलेल्या गावातील शेतकरी पात्र राहणार आहेत.
अनुदानासाठी अर्ज कसा करावा
शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणी यादी मध्ये नाव आहे का तपासा आपल्या नावाची खतरजम संबंधित कृषी सहाय्यक किंवा पोर्टलवर जाऊन करावी. ज्या शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी केली नाही, परंतु त्यांच्या सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद आहे, त्यांनी गावातील तलाठी कार्यालयाशी संपर्क साधा. वनपट्टेधारक शेतकऱ्यांनी संबंधित तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.
महत्त्वाच्या तारखा व कागदपत्रे:
पात्र शेतकऱ्यांनी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत आधार संमती पत्र आणि न हरकत प्रमाणपत्र संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी हे 28 फेब्रुवारी पर्यंत जमा करावे. या प्रमाणपत्राचे नमुने कृषी सहाय्यक त्यांच्याकडे उपलब्ध असणार आहेत.
हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! पाईपलाईन अनुदान योजना सुरू; लगेच अर्ज करा
अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
विभागीय कृषी संचालक कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे संपर्क साधू शकता.
ही संधी सर्व पत्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर शोधावी आणि सरकारच्या अर्थसहाय योजनेचा लाभ घ्यावा! तुमच्या शेतकरी मित्रांना हा लेख जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना याचा फायदा होणार आहे.