Cotton Price: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबर 2025 पर्यंत कापसाला काय दर मिळतील?


Cotton Price: महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांसाठी कापूस हे केवळ पीक नाही तर त्यांच्या आर्थिक गणिताचे आधार आहे. खरीप हंगामातील उत्पादनाचा मोठा भाग कापसावर अवलंबून असतो. कापसाला महाराष्ट्रात शेतकऱ्याचे पांढरे सोने म्हणून देखील ओळखले जाते. यामुळेच कापसाच्या दरातील चढ-उतार शेतकऱ्यांच्या जीवनावर थेट परिणाम करतात. गेल्या हंगामात अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे आता येणाऱ्या हंगामात कापसाला किती दर मिळणारे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सध्याची बाजारातील स्थिती पाहता कापसाची मागणी खूप कमी झाली आहे. त्यामुळे कापसाचे दर स्थिर झाल्याचे पाहायला मिळते. शेतकऱ्यांकडे सध्या कापूस फारसा शिल्लक नसल्यामुळे आता सर्वांचे लक्ष नवीन खरीप हंगामाकडे लागली आहे. बऱ्याच ठिकाणी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात कापसाला किती दर मिळतो याचे उत्सुकता सर्व शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. Cotton Price

हे पण वाचा| पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे ₹2000 शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार?

कापसाचे भाव काय राहतील?

सध्याच्या परिस्थितीत कापसाच्या बाजारामध्ये मागणी अत्यंत कमी असल्यामुळे दर स्थिर झाल्याचे चित्र पाहायला मिळते. केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाला पुरेशी मागणी नाही ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर काहीसे घसरले आहेत. 18 जुलै 2025 रोजी सप्टेबर पर्यंत किमतीत खूप मोठा बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे या क्षेत्रातील जाणकाराचे मत आहे. मागील काही दिवसापासून कापसाचे बाजार भाव स्थिर आहेत. मागणी कमी आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे बाजारभाव थंड पडले आहेत. चीन पाकिस्तान आणि बांगलादेश मधून कापसाचे खरेदी कमी झाली आहे. भारताकडेही पुरेसा माल नसल्यामुळे व्यापारीही थांबले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी संयम राखणे आणि पुढील काळात बाजार भाव कसे राहतील याची वाट पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

हे पण वाचा| शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! या नागरिकांना सप्टेंबर महिन्यापासून रेशन मिळणार नाही, यादीत तुमचे नाव आहे का?

सध्या कापसाला प्रत्येक क्विंटल 6,727 ते 6927 रुपये दर मिळत आहे. व्यापारी देखील आता नवीन कापसाची वाट पाहत असल्यामुळे कापसाची खरेदी मंदावली आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे अजून कापूस शिल्लक असेल तर त्याची विक्री करण्याची घाई करू नका. चांगल्या दरासाठी बाजारावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कापूस बाजार अभ्यासक यांच्या मते जोपर्यंत कापसाचा नवीन हंगाम सुरू होत नाही तोपर्यंत बाजारात दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान 2024,25 मध्ये जागतिक कापूस उत्पादन कमी होईल असे तज्ञांनी सांगितले होते. यामुळे भविष्यात दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु सध्या तरी कापसाचे बाजार भाव स्थिर दिसत आहेत.

सध्याचे कापसाचे दर पाहिले तर राजकोट मधील कापसाचे स्पॉट दर 55 हजार 600 रुपये प्रति कॅन्डी (356kg) इतके आहेत. 31 जुलै साठीचे फ्युचर्स दर 56 हजार 600 रुपये प्रति कॅन्डी आहेत. तर 30 सप्टेंबर पर्यंत चे फ्युचर्स दर 58,500 रुपये प्रति कॅन्डी इतके आहेत. याशिवाय 30 एप्रिल 2026 साठी कापूस फ्युचर्स दर 9145 रुपये प्रति 20 किलो इतके असण्याची शक्यता आहे. सध्या सप्टेंबर 2025 पर्यंत कापसाच्या दरात मोठी वाढ अपेक्षित नाही. बाजार स्थिर राहण्याची शक्यता अधिक आहे मात्र जागतिक उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने पुढील काळात कापसाचे दर सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारावर लक्ष ठेवून योग्य वेळी योग्य विक्री करणे फायद्याचे ठरू शकते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Cotton Price: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबर 2025 पर्यंत कापसाला काय दर मिळतील?”

Leave a Comment

error: Content is protected !!