सिबिल स्कोर खराब झालाय? तर या पद्धतीने वाढवा तुमचा सिबिल स्कोर, जाणून घ्या ही पद्धत

CIBIL Score Increase : सध्या अनेक लोक कर्ज घेण्यासाठी बँक आणि फायनान्स कंपन्यांच्या दारात जात असतात. परंतु तिथे एक मोठा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे CIBIL Score हा सिबिल स्कोर खराब असल्यामुळे अनेक बँका कर्ज उपलब्ध करून देत नाहीत. तुम्ही देखील कर्ज घेण्यासाठी गेला असाल आणि तिथे तुम्हाला मोठा अडथळा आलाय तो म्हणजे खराब सिबिल स्कोर, जर तुमचाही स्कोर 750 च्या खाली असेल, तर बँका सहजपणे कर्ज देण्यास तयार राहत नाही. काही वेळा कर्ज मिळेलच, तरी त्यावर लागणारी व्याज इतके जास्त असते की ते परतफेड करणे कठीण जाते. पण चिंता करू नका. थोडे नियोजन आणि आर्थिक शिस्त पाळली, तर हा स्कोर सुधारता येतो, चला तर मग, जाणून घेऊया सिबिल स्कोर म्हणजे नेमकं काय आणि तो सुधारण्यासाठी कोणत्या टीप्स उपयुक्त ठरू शकतात.CIBIL Score Increase

सिबिल स्कोर म्हणजे काय ?

सिबिल स्कोर ( Cibil score) हा एक तिमासिक क्रेडिट रेटिंग स्कोर असतो, जो 300 ते 900 च्या दरम्यान असतो. हा स्कोर तुम्ही वेळेवर कर्जाची किंवा क्रेडिट कार्डची परतफेड करता का, या वर आधारित असतो. 750 च्या पुढील स्कोअर हा चांगला स्कोर मानला जातो आणि बँकिंग साठी तो एक सकारात्मक सिग्नल असतो की हा व्यक्ती विश्वासू आहे.

परंतु सिबिल स्कोर खराब होण्याचे काही कारणे देखील आहेत, वेळेवर कर्ज किंवा EMI न भरल्यामुळे, क्रेडिट कार्डचे उगाच जास्त वापर, कर्ज घेऊन ते डिफॉल्ट करणे, अनेक ठिकाणी एकाच वेळी कर्जासाठी अर्ज करणे, जुने कर्ज किंवा क्रेडिट कार्ड बंद केल्यावर माहिती अपडेट न होणे

या पद्धतीने तुमचा CIBIL स्कोर वाढवा

सिबिल स्कोर मध्ये सर्वात जास्त महत्त्वाचे योगदान असतं पेमेंट हिस्टरीचं, जर वेळेवर EMI किंवा क्रेडिट कार्ड बिल भरत नसाल, तर तुमचा स्कोर वेगाने खाली जातो. त्यामुळे शक्य असल्यास ऑटो डेबिट कार्डची सोय करा.

तुमचा एकूण क्रेडिट लिमिट पैकी तुम्ही किती रक्कम वापरत आहात, याला CUR म्हणतात. उदाहरणार्थ, जर तुमची क्रिएट लिमिट एक लाख आहे, तर महिन्याला 30000 पेक्षा जास्त वापर टाला. जास्त वापर झाल्यास स्कोर घटतो.

जर तुम्ही कुठलेही जुने कर्जपूर्ण भरली असेल, तर त्याची माहिती क्रेडिट ब्युरो कडे योग्य प्रकारे अपडेट झाले आहे हे तापासा काही वेळा ही माहिती अपडेट न झाल्यास स्कोरवर परिणाम होतो.  

जर वारंवार तुमचा खर्च 30% पेक्षा जास्त असेल, तर बँकेकडे क्रेडिट लिमिट वाढवण्याची विनंती करा. यामुळे CUR कमी राहिला आणि स्कोर सुधारेल.

जर काही कारणामुळे तुम्हाला EMI भरायला अडचण येत असेल, तर बँकेची संपर्क साधा. बँक अनेकदा नवीन पेमेंट प्लॅन देतात. त्यामुळे तुमचा डिपॉल्ट टळतो आणि स्कोर खराब होत नाही.  

वेगवेगळ्या बँकेकडे अनेकदा कर्जासाठी अर्ज केल्यास तुमच्यावर क्रेडिट हँगर असल्याचं समजलं जातं. यामुळे स्कोर खराब होतो. त्यामुळे एकाच वेळी खूप अर्ज टाळा.

प्रत्येक सहा महिन्यांनी स्वतःचा सिविल स्कोर रिपोर्ट चेक करा त्यात काही चुकीची माहिती असल्यास ती लगेच दुरुस्त करणे गरजेचे आहे. CIBIL Score Increase

हे पण वाचा | 1 मे पासून ATM साठी लागू होणार हा नवीन नियम, आता एटीएम वापरासाठी भरावे लागणार तुम्हाला एवढे पैसे!

Leave a Comment

error: Content is protected !!