Chhava movie Vicky Kaushal salary : विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट छावा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या चित्रपटाची क्रेझ पाहता, ॲडव्हान्स बुकिंग जवळपास दोन कोटी रुपयांच्या आसपास गेली आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रसिद्ध झालेला असून, 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमा घरामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य गाथेवर आधारित आहे. Chhava movie Vicky Kaushal salary
चित्रपटाच्या दरम्यान कथेप्रमाणे त्यांच्या स्टारकास्टची फी देखील चर्चेचा विषय ठरत आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या अभिनेत्याला किती मानधन मिळाले आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेला लेख वाचा.
विकी कौशल – 10 कोटी रुपये Vicky Kaushal Chhawa movie fee
छावा या चित्रपटामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या ऐतिहासिक पात्रासाठी त्याने तब्बल दहा कोटी रुपये मानधन घेतले आहे.
रश्मिका मंदाना – 4 कोटी रुपये Rashmika Mandana Chhawa movie fee
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना या चित्रपटात येसूबाई भोसले यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी रश्मिका मंदनाला चार कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
हे पण वाचा : “छावा” सिनेमाने रिलीजपूर्वीच कमावले कोट्यावधी रुपये; ॲडव्हान्स बुकिंगने इतिहास रचला! ‘
अक्षय खन्ना – 2 कोटी रुपये Akshaye Khanna Chhawa movie salary
अक्षय खन्ना या चित्रपटांमध्ये औरंगजेब यांची भूमिका साकारत आहे. दृश्यम टू नंतर अक्षय खन्ना छावा या चित्रपटात दिसणार या भूमिकेसाठी त्याला 2 कोटी रुपये मानधन देण्यात येत आहे.
आशुतोष राणा – 80 लाख रुपये Ashutosh Rana Chhawa movie fee
आशुतोष राणा यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारलेली आहे. त्यांच्या दमदार भूमिकेसाठी त्यांना 80 लाख रुपये मानधन मिळालेले आहे.
दिव्या दत्ता – 45 लाख रुपये Divya Dutta Chhawa movie fee
या चित्रपटामध्ये अभिनेत्री दिव्या दत्ता महत्त्वाच्या भूमिकेमध्ये असणार आहे तिच्या भूमिकेसाठी तिला 45 लाख रुपये फी मिळाली आहे.
14 फेब्रुवारीला होणार छावा चा भव्य प्रदर्शन
विकी कौशल आणि रश्मिका मंदाना पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. b जवा हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी उपस्थित होणार आहे.
चित्रपट ट्रेलर :
बातमी स्त्रोत : HindustanTimes
1 thought on “‘छावा’ चित्रपटासाठी विकी कौशलने घेतले इतके रुपये मानधन! जाणून घ्या संपूर्ण माहिती”