Chhava Cinema Earnings : सध्या संपूर्ण सिनेमासृष्टीमध्ये विकी कौशल आणि रश्मीका मंदाना यांच्या “छावा” सिनेमाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. हा ऐतिहासिक चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. मराठा साम्राज्याचे पराक्रम युद्ध छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर उत्सुक आहेत. Chhava Cinema Earnings
ॲडव्हान्स बुकिंग मध्ये छावा चा धमाका! (Chhawa’s advance booking is a blast!)
छावा सिनेमा हा सध्या मोठा लोकप्रिय ठरत चाललेला आहे. या सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. 9 फेब्रुवारी 2025 रोजी बुकिंग सुरू होताच एका दिवसामध्ये तब्बल 81,991 तिकीट विकली गेली आहे. या तिकिटांच्या विक्रीतून चित्रपटाने तब्बल 2.35 कोटी रुपयांचा गल्ला कमवलेला आहे.
सिनेमाज ट्रेलर प्रसिद्ध झाल्यापासून त्याबद्दलची उत्सुकता वाढलेली होती. अनेक वादांच्या चर्चा मध्ये राहूनही छावा ने चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. आता प्रदर्शनाच्या आधीच एवढ्या मोठ्या संख्येने तिकीट बुकिंग झाल्याने हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग करेल, असे चित्रपट तज्ञांचे म्हणणे आहे.
हे पण वाचा | Vivo V50 लवकरच होणार भारतामध्ये लॉन्च, किंमत आणि फीचर्स पाहून तुम्ही आनंदाने उड्या मारू लागताल
संपूर्ण भारतात छावा ला मोठ्या प्रमाणात शो (Large scale shows across India)
- हिंदी 2D: 5,444 शो
- हिंदी IMAX 2D : 61 शो
- हिंदी 4DX : 51 शो
- हिंदी ICE : 9 शो
छावा ची कथा आणि कलाकार (The story and cast of Chhawa )
छावा हा चित्रपट मराठा साम्राज्य शूर वीर योद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित आहे. या सिनेमांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेमध्ये विकी कौशल हे आहेत तर, महाराणी येसूबाईच्या भूमिकेमध्ये रश्मीका मंदना या झळकणार आहेत. याशिवाय “अक्षय खन्ना” हे औरंगजेबच्या भूमिकेमध्ये खलनायकची भूमिका साकारणार आहेत. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माते दिनेश विजन यांनी भव्य दिव्य ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांसमोर आणला आहे.
छावा बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम प्रस्थापित करणार? ( Will Chhaava set a new record at the box office? )
छावा चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग ने पहिल्याच दिवशी कोट्यावधी रुपये कमावले आहे. प्रदर्शनाच्या आधीच हा चित्रपट एवढ्या मोठ्या व्यवसाय करत असल्याने, बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता 14 फेब्रुवारी रोजी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो प्रेक्षकांना किती भावतो हे पाहणे उत्सुकताचे ठरेल!
( अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला चालू घडामोडी विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल.)
3 thoughts on ““छावा” सिनेमाने रिलीजपूर्वीच कमावले कोट्यावधी रुपये; ॲडव्हान्स बुकिंगने इतिहास रचला! ‘”